फोटोग्राफी

मराठवाड्यातील स्‍थिती

सकाळ डिजिटल टीम
जालना - अंकुशनगर परिसरातील फळबागेत शिरलेले पाणी.

नांदेड
शहरात १४४ तर जिल्ह्यात १४० मि.मी. पावसाची नोंद 
विष्णुपुरी धरणामध्ये ६० टक्के पाणीसाठा 
घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट
लोहा तालुक्‍यात तीन जनावरांचा वीज पडून मृत्यू
नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांचा तुटला संपर्क

उस्मानाबाद
२४ तासांत सरासरी ६५.०९ मिलिमीटर पाऊस 
जिल्ह्यातील १६ महसूल मंडळांत अतिवृष्टी  
उस्मानाबाद शहर, ग्रामीण, तेर, पाडोळी (आ.), भूम, ईट या सहा महसूल मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस 
सर्वात कमी २० मिलिमीटर पाऊस उमरगा महसूल मंडळात 
२१७ मध्यम व लघु प्रकल्पांपैकी यंदा भरले केवळ तीन प्रकल्प 
उर्वरित प्रकल्पांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा 
उस्मानाबादेतील विविध भागांत घरांमध्ये शिरले पाणी 
तूर, कापूस, ऊस आणि उशिराने पेरलेल्या सोयाबीला फायदा

हिंगोली
जिल्ह्यात सरासरी ४४.९६ मिलिमीटर पाऊस 
तीसपैकी चार महसूल मंडळांत अतिवृष्टी
उर्वरित सर्वच मंडळांत १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस 
कयाधू नदी प्रथमच दुथडी भरून वाहू लागली
धरण, तलाव तहानलेलेच ः येलदरी तलावात तीन टक्के, सिध्देश्‍वर धरणात ०.५९ टक्के, तर इसापूर धरणात पाच टक्केच पाणीसाठा 
२७ लघुतलावांपैकी १५ तलाव अद्यापही जोत्याखाली 
नऊ तलावांमध्ये शून्य ते २५ टक्के, तर तीन तलावांमध्ये २६ ते ५० टक्के पाणीसाठा 
मुगाला फटका तर सोयाबीन, कापूस, तुरीला फायदा 

बीड
६३ पैकी ३५ मंडळांत अतिवृष्टी
रविवारी सकाळपर्यंत ६८.५० मिलिमीटर पाऊस 
आतापर्यंतच्या सरासरीच्या ४९.१५ टक्के प्रमाण
चौसाळा, पाटोदा, दासखेड या तीन मंडळांत शंभर मिलिमीटर व त्यापेक्षा अधिक पाऊस
गंगामसला, गाढेपिंपळगाव येथे ३० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस 
उमापूर-मालेगाव (ता. गेवराई) रस्त्यावरील पूल खचल्याने दोन गावांतील संपर्क तुटला 
आष्टी तालुक्‍यातील श्रृंगेरीदेवी नदीला पूर, कासेवाडी आणि आंबेवाडी गावांचा संपर्क तुटला
काही भागांतील कापूस, सोयाबीन, उडीद व मूग या पिकांत पाणी साचल्याने नुकसान 

जालना
४९ महसूल मंडळांपैकी सर्वच मंडळांत जोरदार पाऊस 
परतूर आणि मंठा या दोन तालुक्‍यांत तुलनेत कमी पाऊस
सेवली, वरूड, सातोना, वाटूर, मंठा, ढोकसाळ मंडळात सर्वात कमी पाऊस,  अंबडच्या नूतन वसाहतीत साचले पाणी
सहा मंडळांत पाऊस नावालाच 
गोदावरी नदीच्या शहागड बंधाऱ्याला आले पाणी, तहसीलदारांनी केली पाहणी
आष्टी, सुखापुरी, तीर्थपुरी, महाकाळा परिसरातील नाल्याला पूर, वाहतूक विस्‍कळीत

लातूर 
जिल्ह्यातील सर्वच ५३ महसूल मंडळांत अतिवृष्टी  
३१ महसूल मंडळांत तर शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस 
सलग वीस तास मूर पाऊस. मांजरा, तावरजा नद्यांना पाणी 
सरासरी १०४.५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

परभणी 
जिल्ह्यात दुपारपर्यंत ४१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालम तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाल्याने लेंडी, गळाटी या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे आठ गावांचा संपर्क तुटला. पूर्णा तालुक्‍यात तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कसुरा नदीच्या पाण्यामुळे सेलू-परभणी तसेच सेलू-पाथरी हे रस्ते बंद झाले असून तीन गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, गोदावरी, पूर्णा नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुष्काळाचे सावट हटले
लातूर - जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. त्यात सोमवारी (ता. २१) शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पोळा सणही आला. या सणावर दुष्काळाचे सावट होते; पण रविवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे या सणावरील दुष्काळाचे सावट हटले आहे. त्यामुळे रविवारी (ता. २०) शेतकऱ्यांनी बैलांची मोठ्या उत्साहात खांदेमळणी केली. लातूर जिल्ह्यात पाच लाख ७५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT