Dhanush and Aishwarya Divorce
मनोरंजन विश्वातील (Entertainment World) सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टॉलीवूडचा सुपरस्टार रजनीकांतच्या (Tollywood Superstar Rajnikanth) मुलीचा घटस्फोट झाला आहे. तिनं प्रसिद्ध अभिनेता धनुषसोबत (Dhanush And Aishwarya Divorce) लग्न केलं होतं ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष हे आता विभक्त झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील बेबनावाची चर्चा सुरु होती. आता सोशल मीडियावर धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातमीला उधाण आले आहे. त्या दोघांनी सोशल मीडियावरुन ही बातमी देऊन चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. 18 वर्ष चाललेल्या या संसाराला आता कुणाची नजर लागली आहे. धनुष आणि ऐश्वर्याची मैत्रीण कमल हासनची मुलगी श्रृती हासनचे (Tollywood actress Shruti Hassan) फोटो व्हायरल झाल्यानं वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.
धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत (Dhanush aishwarya rajnikant) हे टॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल होतं. आता त्यांच्या लग्नाला ग्रहण लागलं असून त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वास्तविक धनुष आणि ऐश्वर्या यांच्यात वादाचे कारण ऐश्वर्याची लहानपणीची मैत्रीण ठरल्याचे बोललं जात आहे. ती अभिनेत्री म्हणजे श्रृती हासन. तिची आणि धनुषची लवस्टोरी सुरु असल्याची चर्चा आहे. 2011 मध्ये धनुष आणि श्रृती हासन यांनी एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केले होते. तिचा तो पहिलाच चित्रपट होता. तेव्हापासून त्यांच्यातील अफेयरची चर्चा रंगली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनुष आणि ऐश्वर्याचा संसार आता तुटण्याच्या मार्गावर आहे. यासगळ्या प्रकरणावर श्रृतीनं एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली होती. माझ्यात धनुषमध्ये असं काही नसल्याचे तिनं यावेळी सांगितले होते. मला प्रत्येकाला प्रत्येकवेळी स्पष्टीकरण द्यायची काही गरज नसल्याची प्रतिक्रिया श्रृती हासननं दिली होती. दुसरीकडे तिनं धनुष हा आपला सर्वात जवळचा मित्र असल्याचं म्हटलं होतं. लोकं माझ्याविषयी काय बोलतात याचा मला काहीही फरक पडत नाही. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं श्रृतीनं म्हटलं होतं. वास्तविक त्यांच्यातील बाँडिंग हे काही फॅन्सपासून लपून राहिलं नसल्याचं दिसून आलं आहे. आता सोशल मीडियावर धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातमीला उधाण आले आहे. त्या दोघांनी सोशल मीडियावरुन ही बातमी देऊन चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.