Relationship Tips in Marathi: प्रेम ही खूप सुंदर भावना आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे आपल्या सेल्फ रिस्पेक्ट (Self respect) आणि मेंटल हेल्थसाठी किती धोकादायक होऊ शकतो. प्रेम जेव्हा मर्यादेच्या पुढे जाते तेव्हा ते एक वाईट सवय होऊन जाते त्याला लव्ह अॅडिक्शन (Love Addiction)म्हणतात. त्यामध्ये लोक समोरच्या व्यक्तीचे प्रेम मिळविण्यासाठी दुसऱ्याला स्वत:पेक्षा जास्त महत्त्व देतात. त्यांना नेहमी खूश ठेवण्याचा प्रयत्न करू लागतात. लव्ह अॅडिक्शन असलेले लोक खूप जास्त भावनिक (Emotional)असतात, पण त्यांनी एक प्रकारे ध्यास घेतलेला असतो आणि असे लोक सहज नैराश्यामध्ये(Depression) जाऊ शकतात. काही लक्षणांवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्ही तर लव्ह अॅडिक्शनला बळी नाही पडला ना? आणि त्यापासून कसे वागावे? (what is love addiction symptoms and side effects mental health)
प्रेमाला देतात प्राधान्य लव्ह अॅडिक्शनला बळी पडलेल्या व्यक्तीना वारंवार आणि सतत प्रेमाची गरज असल्याचे जाणवते. रिलेशनशीपमध्ये काही वेळ ते व्यवस्थित असतात पण जेव्हा हा काळ संपण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला सावध व्हायला हवे. इच्छा नसली तरी तुम्हा वारंवार त्यांच्याकडे जाण्याचे कारणे शोधत राहतात त्यामुळे तुम्हाला माईंड डायवर्ट करण्याची (Mind Divert)गरज असते.
जोडीदाराला सर्वस्व मानतात
जेव्हा तुम्हाला वाटते की, तुम्ही तुमच्या पार्टनरशिवाय एक तास देखील घालवू शकत नाही तर विश्वास ठेवा की तुम्हाला त्याचे अॅडिक्शन झाले आहे. तुम्हाला आपला पार्टनरमध्ये फक्त चांगल्या गोष्टी दिसतात. त्यांच्या चूकीच्या गोष्टींना देखील तुम्ही जस्टिफाई (Justify)करू लागता. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला सर्वस्व मानले असेल तर तुम्हाला थोडं थांबण्याची आवश्यकता आहे.
भावनिकदृष्ट्या पार्टनरवर निर्भर होणे तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलला नाही म्हणून जर तुम्हाला राग येत असेल आणि भेटण्याचा प्लॅन ठरताच तुम्ही खूप आनंदी होत असताल तर त्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही भावनिकदृष्ट्या पार्टनरवर निर्भर आहात. तुम्हाला आपल्या मेंटल आणि इमोशनल हेल्थवर काम करण्याची गरज आहे एकटे राहू न शकणे
लव्ह अॅडिक्शनचा सर्वात मोठे लक्षण हे आहे की, ज्यामध्ये पार्टनरशिवाय एकटे नाही राहू शकत. स्वत:ला समजावा की, पार्टनरशिवाय स्वत:सोबत वेळ घालविणे तेवढेच गरजेचे आहे. मग, ते एकट्याने खायचे असो की सलूनमध्ये स्पा(Spa) एन्जॉय करणे असो. पण जेव्हा तुम्हाला अशी वेळ घालवणे अवघड होत असेल तर तुमचे प्रेम गरजेपेक्षा जास्त वाढून अॅडिक्शन बनले आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.