Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 15 वर्षीय मुलीला पळवून लग्न; 11 महिन्यांचा मुलगा झाल्यावर संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शिरसोली शिवारात सालदारकी करणाऱ्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलीचे दोन वर्षांपूर्वी अपहरण झाले होते. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. मात्र, २२ महिने पोलिस संशयित व पीडितेला शोधू शकले नाहीत.

अखेर शुक्रवारी (ता. २८) मध्यरात्री एमआयडीसी पोलिसांनी जामनेर शिवारातून संशयित सुनील बारेला याला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. (15 year old girl kidnapped and married jalgaon crime news)

शिरसोली येथील तुकाराम बारी यांच्याकडे सालदार म्हणून आदिवासी कुटुंब वास्तव्यास होते. या कुटुंबातील अल्पवयीन मुलीस ९ ऑक्टोबर २०२१ ला संशयिताने पळवून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.

गेली दोन वर्षे पीडिता व संशयित पोलिसांना मिळून आले नाहीत. मिळालेल्या माहितीवरून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने तोंडापूर (ता. जामनेर) येथील एका शेतशिवारातून संशयित सुनील दलू बारेला (वय २४) याला अटक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, संशयित सुनील दलू बारेला याने पीडितेशी मंदिरात विवाह करून घेतला व तो जामनेर तालुक्यात सालदार म्हणून काम करीत होता. पीडिता व संशयित यांना ११ महिन्यांचे बाळ असून, दोन वर्षांनंतर एमआयडीसी पोलिसांनी पित्याला अटक केली.

बालिका अत्याचारातून बाळाचा जन्म झाल्यानंतर दाखल गुन्ह्यात अतिरिक्त कलम वाढविण्यात आले. संशयिताला न्यायाधीश केंद्रे यांच्या न्यायालयाने १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT