Ticket Checking at the railway station  esakal
जळगाव

Jalgaon News : फुकट्या रेल्वेप्रवाशांकडून पावणेचार कोटी दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मध्य रेल्वेने भुसावळ विभागात दिवाळीच्या सण उत्सवात गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवास करणाऱ्या ४१ हजार रेल्वे प्रवाशांकडून सुमारे पावणेचार कोटीचा दंड वसूल केला.(3 crore fine collected from passengers by railway department jalgaon news)

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग, सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील ५३७ तिकीट तपासणीस सहभागी झाले.

नऊ ते १५ नोव्हेंबर अशा आठवडाभरात दिवाळीसाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीटांची शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात, भुसावळ विभागामध्ये सखोल तिकीट तपासणी मोहिम राबवून भुसावळ विभागाचा नवीन विक्रम प्रस्थपित केला.

दिवाळी सुट्टीच्या या काळात विनातिकीट, अनधिकृत प्रवास करणाऱ्या ४१ हजार ८९४ प्रवाशांकडून ३ कोटी ७३ लाखाचा दंड वसूल करण्यात आला.

त्यामुळे नोव्हेंबर महिण्यात भुसावळ मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक तिकीट तपासणीच्या आज पर्यंतच्या दंड वसुलीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एकूण ७ हजार ३७० प्रवाशांकडून ६८.८५ लाख रुपये दंड वसूल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagaland IED Blast: आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ IED ब्लास्ट! १ जवान शहीद, ४ जण जखमी; स्फोटानंतर मोठे सर्च ऑपरेशन

Leopard Attack in Pune: शिंगवे परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला; प्रसंगावधानामुळे जीव वाचला, ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Cemetery Wall Repair: ‘सकाळ’च्या वृत्ताला प्रतिसाद; दावडी स्मशानभूमी भिंत दुरुस्तीला १० लाख मंजूर, आणखी निधीची ग्रामस्थांची मागणी

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT