Jalgaon News : प्रदूषणात महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाची भर; धुळीचा त्रास अन् वाहतुकीचा खोळंबा

On the highway passing through the city, the patchwork repair in front of IMI College, while in the second photo, the dug-up road.
On the highway passing through the city, the patchwork repair in front of IMI College, while in the second photo, the dug-up road.esakal

Jalgaon News : अगदी वर्षभरात खचून दुरवस्था झालेल्या शहरातील महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. दोन महिन्यात खोदून ठेवलेल्या या रस्त्याच्या कामाने दुरुस्ती तर दूर, पण शहराच्या प्रदूषणात धुळीची भर घातली आहे.

अद्याप हे काम पूर्ण झालेले नसून रस्त्याच्या बाजूने वाहतूक वळविल्याने वाहनधारकांची कसरत व वाहतुकीचा दिवसभर खोळंबा असे चित्र आयएमआर महाविद्यालयासमोरील महामार्गावर दिसून येते आहे.(construction of highway repair work in pollution jalgaon news )

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे विस्तारीकरण करण्याचे ठरले. खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंतच्या सात किलोमीटर टप्प्यातील रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जळगाव शहराला वळसा घालून पाळधी ते तरसोद असा बायपास काढण्यात आल्याने शहरातील महामार्गाचे काम कसेबसे मंजूर झाले आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आशीर्वादाने कसे बसे उरकण्यात आले.

निर्मितीपासून समस्या

शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या महामार्गावर आकाशवाणी, इच्छादेव व अजिंठा चौकात दिलेले तांत्रिक दोष असलेले सर्कल, काही ठिकाणी काढण्यात आलेले भुयारी मार्ग (अंडरपास) त्यांची रचना या कामांवर काही तज्ज्ञांनी आक्षेप घेतले. त्यात त्या-त्या वेळी किरकोळ दुरुस्तीही करण्यात आली. मात्र, तेवढ्याने हा महामार्ग परिपूर्ण होणार नव्हता.

मूळ ‘डीपीआर’ चुकीचा

महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे ठरले त्याआधीच अस्तित्वात असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाऐवजी आहे त्या मार्गावरवरुन ‘उड्डाणपुल (फ्लाय ओव्हर) होणे गरजेचे होते. त्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक विभागली जावून वाहतुकीचा खोळंबा टळणार होता. मात्र, तेवढी इच्छाशक्ती न दाखविल्याने रस्त्याचे चौपदरीकरण पुढे रेटण्यात आले.

On the highway passing through the city, the patchwork repair in front of IMI College, while in the second photo, the dug-up road.
Jalgaon Crime News : अमळनेरला चोरट्‍यांनी 3 दुकाने फोडली

त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविताना अनेक चुका झाल्या. या प्रकल्प अहवालात ज्या ठिकाणी गरज नाही. त्या जागी सर्कल व जिथे आवश्‍यकता आहे अशा जागांवर भुयारी मार्ग (अंडरपास) देण्यात आले. शिवाय, अन्य तांत्रिक त्रुटीही त्यात राहून गेल्या.

काम निकृष्ट, उखडला मार्ग

डीपीआर चुकीचा झाला, हे थोडे नव्हते म्हणून की काय, या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले. जांडू कनस्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले. मात्र, सुरवातीपासून या कामाचा दर्जा राखला गेला नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या.

मात्र, प्रत्येकवेळी त्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले. अखेरीस मार्गाचे काम पूर्ण झाले. अर्थात, त्याचे आयुष्य जास्त काळ नव्हतेच. काम पूर्ण झाल्यानंतर वर्षभरातच या महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहे तर काही ठिकाणी मार्गच खूचन गेला आहे.

आयएमआर कॉलेजसमोर महामार्गाची दुरवस्था

संपूर्ण मार्गाचे काम निकृष्ट झाले असले तरी आयएमआर महाविद्यालयासमोर हा मार्ग सातत्याने खचत आहे. हा जवळपास शंभर मीटरचा टप्पा व पुढे अग्रवाल हॉस्पिटल चौक ते आकाशवाणी चौकाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील टप्प्यात मोठे खड्डे पडले आहे.

On the highway passing through the city, the patchwork repair in front of IMI College, while in the second photo, the dug-up road.
Jalgaon News: पाडळसे प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही : मंत्री अनिल पाटील

आयएमआयसमोरील मार्ग तर अक्षरश: खचला आहे. वारंवार डागडुजी करुनही तो दुरुस्त होत नाही म्हणून आता पूर्ण उखडून नव्याने तो करण्यात येत आहे.

दोन महिन्यांपासून काम सुरु

दोन महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आयएमआर महाविद्यालयाकडील बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यावरील वाहतूक बाजुला कच्च्या वळण रस्त्यावरुन वळविण्यात आली आहे. रस्ता खोदल्याने या ठिकाणी प्रचंड धूळ उडत असून त्यामुळे परिसरात मोठे प्रदूषण होत आहे.

दुरुस्तीसाठी खडी, मुरुम आदी साहित्य आणून ठेवले असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. वाहतूक कच्च्या रस्त्याने वळविल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत असून वाहतुकीचा खोळंबाही होत आहे.

किरकोळ कामाला दोन महिने कसे?

ज्या टप्प्यात दुरुस्तीचे काम होत आहे, तो अवघ्या शंभर मीटरचा असेल. तरीही त्या कामाला दोन महिने होऊन ते पूर्ण होऊ शकले नाही? त्याबद्दल वाहनधारकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

On the highway passing through the city, the patchwork repair in front of IMI College, while in the second photo, the dug-up road.
Jalgaon News: ‘टॉवर चौक’ वाहतूक सुरक्षा मॉडेल; नियम मोडल्यास कॅमेऱ्याद्वारे दंड

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचेही या कामावर लक्ष नाही, अशी स्थिती आहे. हे काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्‍न उपस्थित होत असून त्यापुढे अग्रवाल हॉस्पिटल चौकाच्या उड्डाणपुलावरील खड्ड्यांची, खचलेल्या मार्गाच्या दुरुस्तीची मागणीही जोर धरु लागली आहे.

On the highway passing through the city, the patchwork repair in front of IMI College, while in the second photo, the dug-up road.
Jalgaon News : बहिणीच्या औक्षणाआधीच भावाचा रेल्वेतून पडून मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com