esakal
esakal
जळगाव

Jalgaon News : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग दुरुस्तीसाठी 61 कोटींचा निधी : खासदार रक्षा खडसे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली. दरम्यान, रावेर ते तळोदा २३२ किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती होणार आहे. (61 crore fund for repair of Burhanpur Ankleshwar Highway jalgaon news)

बऱ्हानपूर -अंकलेश्वर महामार्गावरील एनएच ७५३ बी तळोदा जंक्शनजवळ सुरू होणारा तळोदा -शिरपूर -चोपडा -यावल -फैजपूर -सावदा -रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २३२ किमी महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ६१ कोटी निधी मंजूर झाला असून, त्याबाबत निविदा प्रकाशित झालेली आहे, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

या निधीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणासाठी खासदार रक्षा खडसे यांचा मागील काही वर्षापासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्र्यांकडे निरंतर पाठपुरावा सुरू होता.

त्यानुसार मागील वर्षी सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले असून, सध्या या देखभाल दुरुस्तीसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे.

पुढील टप्यांत चौपदरीकरणासाठी डीपीआर बनून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT