Abduction of a minor girl Gujarat
Abduction of a minor girl Gujarat sakal
जळगाव

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास म्हसदीतून अटक

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : न्याहली (ता. नंदुरबार) येथे सुट्यांमध्ये आजोबाकडे आलेल्या सुरत येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे सुरत येथील एकाने १५ महिन्यांपूर्वी अपहरण केले होते. त्या संशयिताचा शोध घेण्यास येथील अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाला यश आले असून, मुलीसह आरोपीस म्हसदी (ता. साक्री) येथून अटक केली आहे. संशयितावर सुरत येथे २४ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत घटनेची माहिती अशी : न्याहली (ता. नंदुरबार) येथे काशीनाथ थोरात यांच्याकडे सुरत येथून त्यांची १६ वर्षांची अल्पवयीन नात सुट्यांमध्ये आली होती. २९ नोव्हेंबर २०२० ला सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान त्या अल्पवयीन मुलीस सुरत येथील अक्षय शिंदे याने पळवून नेले म्हणून नंदुरबार तालुका पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाकडे सोपविला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू केला.

संशयित अक्षय शिंदे अनेक गुन्ह्यांमध्ये फरारी असल्याचे स्पष्ट झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कळमकर यांनी पथक तयार करून सुरत येथे रवाना केले. पथकाने जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे जाऊन माहिती घेतली. पथकाला म्हसदी (ता. साक्री) येथे असल्याची बातमी पथकास मिळताच सापळा रचला. पथकाने त्याचासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. अक्षय शिंदे (वय २१ वर्षे रा . वृंदावन पार्क , सुन्नी गाव , घर नंबर -६० , पलसाणा सुरत, गुजरात ) असे आहे. त्याचा रेकॉर्ड तपासला असता त्याचेवर सुरत शहर व सुरत ग्रामीण येथे एकुण २४ गुन्हे दाखल असून १६ गुन्ह्यात तो फरार आहे. पथकाचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT