जळगाव

Jalgaon Rain News : बोदवड, जामनेरला परतीच्या पावसाने झोडपले! बोरी, खडका नदीला पूर; सात्रीचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rain News : जिल्ह्यातील अमळनेर, बोदवड, पारोळा, जामनेर तालुक्यातील काही भागात शुक्रवारी (ता. २२) मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने अनेक भागांतील शेतात पाणी साचले असून, पिकांचे नुकसान झाले आहे. बोदवड तालुक्यातील लोणवाडीतील २० घरे पाण्याखाली गेली आहेत.

परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. शेवगे बुद्रूक (ता. पारोळा) परिसरातील शिवल्या नालास आलेल्या पुरात बैलजोडी वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली. जामनेर तालुक्यात तोंडापूरसह परिसरात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी जामनेर रस्त्यावरील पुलावर आल्याने सकाळी दहापर्यंत जामनेर ते तोंडापूर वाहतूक बंद होती.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)


अमळनेर तालुक्यात पूर्वसूचना न मिळाल्याने बोरी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठावरील नागरिक चांगलेच भांबावले होते. नदीला मध्यरात्री अचानक पूर आल्याने बोरी नदी दुथडी वाहत आहे.

रात्री प्रवाहाचे प्रमाण जास्त असल्याने भिलाली येथील पुलावरून पाणी वाहत होते. कन्हेरे येथील पुलावरून दोन तीन फूट पाणी वाहत असल्याने सकाळपर्यंत कन्हेरे, बिलखेडे, फापोरे खुर्द या गावांचा संपर्क तुटला होता. त्या गावांना सडावन मार्गे पर्याय उपलब्ध होता. मात्र अमळनेर तालुक्यातील सात्री गाव अजूनही संकटातच आहे.

पूल आणि रस्ता नसल्याने या गावाचा संपर्क जगाशी तुटतो. नदीला पूर आल्याने जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शाळेत पोहचू शकले नाहीत तर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अमळनेरला येऊ शकले नाही. ग्रामसेवक, तलाठी देखील गावात पोहचू शकले नाही. नदीचे पाणी कमी होत नाही, तोपर्यंत गावाला कोणत्याच सुविधा मिळू शकत नाही.

प्रचंड पाऊस अथवा धरणाचे पाणी सोडल्यास नदी काठावरील लोकांना सतर्क करण्यासाठी संबंधित विभागाकडून अलर्ट दिला जातो. सायरन वाजवून सावध केले जाते. गावात दवंडी दिली जाते. मात्र या बाबत प्रशासनालाच काहीच माहिती नसल्याने नागरिकांनी नाराजी आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एक जण वाहून गेल्याची भीती

भिलाली येथील एक जण वाहून गेल्याचे वृत्त कळताच उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर यांनी अमळनेर तालुक्याच्या हद्दीत पोलिस पाटील, तलाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना शोध घेण्यासाठी तैनात केले आहे.

उपविभागीय खेडकर यांनी एसडीआरएफ यंत्रणेला बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु बोरी नदी उथळ आणि काही ठिकाणी खडकाळ असल्याने त्याठिकाणी बोट चालू शकत नाही म्हणून मदत करता येऊ शकत नाही, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT