article about gulabrao patil and eknath khadse politics jalgaon news
article about gulabrao patil and eknath khadse politics jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Politics News : ‘चहा-माफी’चा प्रयोग, आरोपांच्या चिखलफेकीतही राजकीय प्रगल्भतेचा आदर्श

सचिन जोशी

राजकारणात खरेतर सर्वपक्षीय नेते केवळ पक्षीय मतभेद म्हणून एकमेकांवर चिखलफेक करीत असतात. प्रत्यक्षात त्यांचे संबंध अनेकदा अगदी मधुर असतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. दुर्दैवाने पक्षीय मतभेदांमधील तीव्रता वाढून गेल्या काही वर्षांत राजकीय चिखलफेकीचे जे बीभत्स प्रकार होऊ लागलेत, ते चीड आणणारेच आहेत.

मात्र, अशातही राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडविणारे दोन प्रसंग नुकतेच इथं घडलेत. त्यामुळे ‘राजकारण असतंच वाईट...’, असे सरसकट बोलणाऱ्यांच्या वाणीला त्यावरून चाप बसेल. (article about gulabrao patil and eknath khadse politics jalgaon news)

मुळात, गेला आठवडा हा पावसाने दिलेल्या ओढीमुळे जितका गाजायचा त्याहून अधिक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या दौऱ्याने गाजला. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या काळे झेंडे दाखविण्याच्या आंदोलनाने आणि दिग्गज नेते एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील यांच्यातील अब्रूनुकसानीच्या खटल्यावरून अधिक गाजला.

तो इतका, की या तिन्ही विषयांवर राज्यस्तरीय बातम्या झळकल्या आणि तसेही, जळगाव जिल्हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याने इथे काहीही महत्त्वाचे राजकीय घडले, की ते आपसूकच वाहिन्यांवर ‘ब्रेकिंग’ होणारच.

‘शासन आपल्या दारी’साठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौराही ब्रेकिंग न्यूज झाला. त्यांना काळे झेंडे दाखविणार म्हणून रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांना झालेली अटकही ‘ब्रेकिंग’ होती. त्यानंतरही एकनाथ खडसे, अन्य पदाधिकारी, तसेच युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर उडविलेल्या फुग्यांची घटना ‘चॅनल न्यूज’ बनली. या आंदोलनावर उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी खडसेंवर टीका करणारे केलेले भाष्य आणि सरतेशेवटी अब्रूनुकसानीच्या दाव्यात खडसे-गुलाबरावांमध्ये झालेला समझोताही राज्याच्या बातमीचा विषय बनले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकूणच काय? तर आपल्या जिल्ह्यातील राजकीय खडाखडी म्हणजे हमखास ब्रेकिंग न्यूज. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे श्री. खडसे व गुलाबराव पाटलांमध्ये २०१६ पासून सुरू असलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोघा नेत्यांमध्ये झालेला समझोता. २०१६ मध्ये एका भाषणात गुलाबराव पाटलांनी तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये महसूल, कृषीसह विविध खात्यांचे मंत्री असलेल्या खडसेंवर पॉलिहाउससाठी अनुदान लाटल्यासह अनेक आरोप केले होते.

हे आरोप करताना खरेतर पाटलांनी कुठलेही ठोस पुरावे दिले नाहीत. शिवाय, त्या आधीपासून खडसे-पाटलांमध्ये राजकीय खडाजंगी होतच होती, म्हणून या आरोपांच्या आधारे खडसेंनीही पाटलांवर पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करत त्यांना न्यायालयात खेचले. काही वर्षे नेते व खटलाही शांत होता. मात्र, गेल्या आठवड्यापूर्वी अचानक उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जिल्हा न्यायालयात हा दावा पुन्हा सुनावणीसाठी सक्रिय झाला. त्यावर श्री. खडसेंनी गुलाबरावांना माफी मागण्याचे आवाहन करत साद घातली.

पाटलांनीही त्यांच्या शैलीत ‘नाथाभाऊ मोठे आहेत, ते चहाला येणार असतील, तर माफीही मागू’, असा प्रतिसाद दिला. आता श्री. खडसे चहालाही गेले नाही आणि पाटलांनी थेट माफीही मागितली नाही, तरी दोघांनी न्यायालयात एकत्र येऊन ‘चहा-माफी’चा प्रयोग करत समझोताच केलाच. दोघांमध्ये राजकीय मतभेद तीव्र असले, तरी एखादा विषय किती ताणावा, हे दोघांच्याही लक्षात आले आणि त्यांनी राजकीय प्रगल्भता दर्शवत ‘समेट’ घडवली.

दुसऱ्या एका प्रसंगात विधानसभा निवडणुकीला प्रतिस्पर्धी झालेले माजी मंत्री सुरेशदादा जैन व आमदार राजूमामा भोळे पिंप्राळा रथोत्सवानिमित्त एकत्र आले. दोन्ही निवडणुकांवेळी दोघा नेत्यांकडून एकमेकांवर गंभीर आरोप झाले, तो राजकीय डावपेचांतील अपरिहार्यतेचा भाग होता. मात्र, रथोत्सवात एकत्र आल्यानंतर आमदार भोळेंनी ‘सुरेशदादांच्या परंपरेवर वाटचाल करतोय’, असे सांगत त्यांच्याप्रति जो आदर्शभाव व्यक्त केला, तोही राजकीय प्रगल्भतेचे उदाहरण म्हणावे लागेल.

पण राजकीय प्रगल्भता केवळ एवढ्यावरच मर्यादित राहून चालणार नाही. श्री. खडसे, श्री. गुलाबराव असोत, की गिरीश महाजन अथवा सुरेशदादा जैन या दिग्गजांनी जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद व व्यक्तिगत हेवेदावे विसरून पुढे यायला हवे. हे चौघेही नेते ‘विकास’ या केवळ एका मुद्द्यावर जेव्हा एकत्र येतील तेव्हा जिल्ह्याचे चित्र अल्पावधीत पालटू शकेल, याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT