Gulabrao Patil : विकासकामे होत असल्याने विरोधकांचा रडीचा डाव : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal

Gulabrao Patil : राज्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीचे शासन अत्यंत वेगाने जनतेची कामे करीत आहेत. सर्वच कामे या सरकारने केली तर आमचे काय? यामुळे विरोधक आता रडीचा डाव खेळत आहे.

त्यामुळेच ते काळे झेंडे दाखविण्यासारखे प्रकार करीत आहेत, अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. (gulabrao patil statement about opponent party jalgaon news)

येथील पोलिस कवायत मैदानावर मंगळवारी झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, लता सोनवणे, संजय सावकारे, माजी आमदार शिरीष चौधरी, चंदूलाल पटेल, स्मिता वाघ, रोहित निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही जय वीरूची जोडी आहे. राज्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने जनतेची कामे करीत आहेत. अत्यंत गतिमान पद्धतीने जनतेची कामे होत असल्यामुळे विरोधक चिंतित आहेत.

याच सरकारने सर्व कामे केली. आपल्याकडे कोणतेच काम राहणार नाही, असे त्यांना वाटत असल्याने ते आता रडीचा डाव खेळत आहेत. ते आता काळे झेंडे दाखवित आहेत. मात्र, काळे झेंडे कसे दाखवावेत, हेही त्यांनी आमच्याकडून शिकण्याची गरज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gulabrao Patil
Gulabrao Patil: जनतेत खरंच नाराजीए का? गुलाबराव पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

उद्धव ठाकरेंची लायकी नाही : गिरीश महाजन

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर टीका करतात. मात्र मुख्यमंत्री असताना, कोरोना काळात ते घरूनच काम करीत होते.

कधीही घराबाहेर गेले नाहीत. त्यावेळी तुम्ही काय दिवे लावले, हे जनतेने पाहिले आहे. कोरोनात आपण जनतेचे जीव वाचविले, असे सांगण्यासही ठाकरे यांना काहीही वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची त्यांची कोणतीही लायकी नाही.

Gulabrao Patil
Gulabrao Patil : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे ‘सरस’ नियोजन : पालकमंत्री पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com