Accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News: कारची दुचाकीला धडक; मामा- भाचा जखमी

अपघातात मामा-भाचे असे दोन्ही जखमी झाले. जखमींच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृतसेवा

Jalgaon Accident News: रामेश्वर कॉलनीतील रहिवासी पंचवीसवर्षीय तरुण त्याच्या भाच्यासोबत नशिराबादकडून जळगावकडे येत असताना कार चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. (car accident with bike jalgaon Accident news)

अपघातात मामा-भाचे असे दोन्ही जखमी झाले. जखमींच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुळ अंबालहावे तांडा( ता. जामनेर) येथील रहिवासी गोपाल मोतीराम चव्हाण (वय २५) हे कामानिमित्त जळगावी स्थायिक झाले आहेत. कुटुंबीयांसह मेहरुण रामेश्वर कॉलनीत राहतात.

शनिवार (ता.२४) रोजी गोपाल चव्हाण त्यांचा भाचा राधेश्याम अशोक राठोड असे दोघेही नशिराबादकडून जळगावकडे येत असताना त्यांच्या दुचाकी (क्रमांक : एमएच.१९.डी.एच.०५३७)ला राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नाक्याजवळ जळगावकडून भुसावळकडे सुसाट टाटा नेक्सॉन कार (क्र एमएच.१६.सी.वाय.४२७३) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटारसायकलीस समोरून जोरदार धडक दिली.

अपघातात दुचाकीस्वार मामा गोपाल चव्हाण भाचा राधेश्याम राठोड असे दोघेही जखमी झाले.जखमींचा जबाब नोंदविल्यावर नशिराबाद पोलिसात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT