Officers and staff with illegal timber stocks seized in forest department raids. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अवैध लाकूड साठा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

तालुक्यातील दहिगाव, कोरपावली गावाकडील कच्च्या रस्त्यावर अवैधरीत्या साठवून ठेवलेले लाकूड वन विभागाच्या पथकाने पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील दहिगाव, कोरपावली गावाकडील कच्च्या रस्त्यावर अवैधरीत्या साठवून ठेवलेले लाकूड वन विभागाच्या पथकाने पकडले आहे.

तब्बल एक लाख ३४ हजार रुपये किमतीचा हा लाकूड साठा असून, या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (case registered against one for confiscation of illegal timber stocks jalgaon crime news)

दहिगाव (ता. यावल) येथील कोरपावली कच्च्या रस्त्यावर फकिरा दगडू तडवी (रा. नायगाव) याने अवैधरीत्या जळाऊ लाकूड साठा साठवण करून ठेवला होता.

येथे गुरुवारी गुप्त बातमीवरून यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, सरला भोंगरे, अश्रफ तडवी, अक्षय रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

त्यात इंजायली लाकूड साठा यात इमारती ९३ नग १२.२१५ घनमीटर, पंचरास जळाऊ थप्पी ११५.५१२ घनमीटर असा एकूण १ लाख ३४ हजार ३१ रुपये शासकीय किमतीचा लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे.

या बाबत फकिरा तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

Miami Airport Plane Crash : ॲमेझॉनचं विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरलं अ्न रस्त्यावर आलं, वाहनांना धडक; ५ जणांचा मृत्यू

पुन्हा पुन्हा तेच चेहरे पाहून कंटाळली तापसी पन्नू? बॉलीवूडच्या कास्टिंगवर तापसी पन्नूची टीका करत म्हणाली, 'रोमँटिक कॉमेडीत तेच...'

SCROLL FOR NEXT