Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेतील अनुकंपा भरती लवकरच; आदेश 2 दिवसात निघणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेतील अनुकंपा कर्मचारी भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून येत्या दोन महिन्यात ती होणार असल्याची माहिती आहे. जळगाव महापालिकेत अनुकंपा भरतीचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.

त्याबाबतच्या प्रस्तावाची छाननी आता सुरू करण्यात आली आहे.(Compassionate Recruitment in Municipal Corporation Soon jalgaon news )

महापालिकेत ८६ पदासाठी कंत्राटी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज मागवून मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाहीत. येत्या दोन दिवसात त्यावर स्वाक्षऱ्या होवून संबधित निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.

आक्षेप असलेल्या पदोन्नती

सरकारच्या मुख्य लेखापरीक्षक विभागातर्फे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर पदोन्नतीचे आक्षेप होते. त्याबाबत आयुक्तांकडे निर्णय घेण्याचे अधिकार सरकारकडून देण्यात आले आहेत. तब्बल २१० कर्मचाऱ्यांवर आक्षेप होते.

त्यापैकी काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. काहींचे निधन झाले आहे. सद्यस्थितीत ९७ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पदोन्नतीबाबत प्रक्रिया सुरू असून त्याबाबत लवकरच आदेश जारी करण्यात येणार असल्याचे माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

Maharashtra Live News : देऊळगाव राजा मधील दोन बड्या मसाला व्यावसायिकांवर एफडीएची धडक कारवाई, एक कोटींचा माल जप्त

Kolhapur Rickshaw Drivers RTO Report : 'सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो...'; कोल्हापूरच्या रिक्षाचालकांचे मराठी खणखणीत; परीक्षेची गरजच नसल्याचा पाठविला अहवाल

SCROLL FOR NEXT