Jalgaon Municipal News : जळगाव महापालिकेचा प्रशासकीय पेच सुटणार?

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : जळगाव शहरवासीयांनी पालिका ते महापालिका यादरम्यान अनेक राजकीय पेच अनुभवले आहेत. मात्र, प्रशासकीय तिढा मात्र पहिल्यांदाच अनुभवला येत आहे. आयुक्ताच्या खुर्चीवर बसणार कोण? याचा फैसला गुरुवारी (ता. ५) तरी होणार काय, याकडेच नागरिकांचे लक्ष आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : ...अखेर त्याने मृत्यूशी झुंज जिंकली! कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर बालक आईच्या कुशीत परतले

जळगाव महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची अचानक बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर परभणी येथील देवीदास पवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. शासनाकडून पत्र प्राप्त होताच श्री. पवार यांनी जळगावात दाखल होऊन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.

त्या वेळी जळगावच्या आयुक्त डॉ. गायकवाड या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. आयुक्त डॉ. गायकवाड यांनी आपल्या बदलीलाच थेट ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. निकाल देताना ‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली. मात्र, जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार देवीदास पवार यांच्याकडे पुढील सुनावणीपर्यंत ठेवला.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : वयोवृद्ध पित्याच्या शेतावर फिरवला रोटावेटर; मालमत्तेच्या हिस्यावरुन मुलाचा प्रताप

मात्र, यातही धोरणात्मक फायलींवर स्वाक्षऱ्या न करण्याबाबत निर्देशही दिले. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला खीळ बसली आहे. नियमित आयुक्तपदाची नियुक्ती झाल्यानंतरच प्रशासकीय कामकाज सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निकालाची शक्यता

महापालिकेच्या आयुक्तपदाबाबत ‘मॅट’मध्ये आतापर्यंत तीन सुनावण्या झाल्या आहेत. गुरुवारी (ता. ५) निकालाची शक्यता आहे. आयुक्तपदी देवीदास पवार की डॉ. विद्या गायकवाड राहणार, याचा निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आणखी पुढची तारीख पडल्यास महापालिकेच्या अनेक कामांना खीळ बसण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nitin Gadkari Orders Inquiry Into Asoda Flyover Collapse
Shalarth ID Scam
Jalgaon railway flyover latest update
An ACB team caught a Jalgaon Jamod Panchayat Samiti officer allegedly accepting a ₹25,000 bribe for clearing development work bills.
Marathi News Esakal
www.esakal.com