जळगाव

जळगाव जिल्ह्यात पूर्ण कुटुंब कोरोना बाधित होण्याच्या केसेस जास्त 

सचिन जोशी

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून, ही दुसरी लाट आहे की नाही, याबाबत आत्ताच सांगणे कठीण आहे. या वाढत्या रुग्णांमध्ये कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे बाधित होण्याच्या केसेस अधिक आहेत, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी व्यक्त केले. 

ऑक्टोबरनंतर जिह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत होता. जानेवारीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या तीनशेपर्यंत घटलेली असताना दोन आठवड्यांपासून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या अचानक उद्‌भवलेल्या स्थितीबाबत डॉ. रामानंद यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काही अभ्यासपूर्ण मते मांडली. 

लाट म्हणणे कठीण 
डॉ. रामानंद म्हणाले, की गेल्या पाच-सात दिवसांत ते अधिक वेगाने समोर आले. मात्र, तरीही ही दुसरी लाट आहे का, याबाबत बोलणे धाडसाचे ठरेल. संसर्ग नियंत्रणात येत असताना ही स्थिती लग्नसोहळे व अन्य ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे व गर्दीत कोणतीही काळजी न घेतल्याने उद्‌भवली, असे चित्र सध्यातरी दिसते. 

गंभीर रुग्ण कमी 
रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे संसर्ग वेगात असल्याचे दिसते. मात्र, याआधीच्या टप्प्याच्या तुलनेत वाढत असलेल्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्ण कमी आहेत. आयसीयूमधील रुग्णांची संख्या मर्यादित असून, आमची यंत्रणा सज्ज असल्याचे ते म्हणाले. 

पूर्ण कुटुंब बाधितचे प्रमाण 
वाढणाऱ्या रुग्णांचे चित्र सार्वत्रिक नाही. आकडा मोठा असला तरी एकाच कुटुंबातील एक-दोनपेक्षा अधिक सदस्य बाधित येत असल्याचे प्रमाण त्यात अधिक आहे. लग्न व अन्य सोहळे, एकत्रीकरण यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत असल्याच्या केसेस जास्त आहेत. 

नवा ‘स्ट्रेन’ शक्य 
काही काळानंतर विषाणू स्वरूप बदलतो, त्यानुसार हा म्युटेशन झालेला नवा ‘स्ट्रेन’ आहे का, याबाबत विचारले असता ते शक्य आहे. कारण विषाणू स्वरूप बदलतो, याची निरीक्षणे आहेत. नव्या ‘स्ट्रेन’चा संसर्ग वेगात होत असला तरी त्या संसर्गातील तीव्रता (रुग्ण गंभीर होणे) कमी आहे, असेही डॉ. रामानंद यांनी स्पष्ट केले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT