Corona esakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढतोय...

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनाच्या (Corona) चौथ्या लाटेच्या (Fourth wave) उंबरठ्यावर राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना, जळगाव जिल्ह्यातही रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या २५ वर पोचली आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. तीन दिवसांपासून ही संख्या चार, पाचपेक्षा जास्त आढळून येत आहे. मंगळवारी (ता. २१) एकाच दिवसात ७ रुग्ण समोर आल्यानंतर बुधवार (ता. २२)च्या अहवालातही नव्या ८ रुग्णांची नोंद झाली. त्यात जळगाव शहरात १, जळगाव ग्रामीणला १, भुसावळ व चोपडा तालुक्यात प्रत्येकी २, धरणगावला १, असे ८ रुग्ण समोर आले. तर दिवसभरात ७ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे सध्या सक्रिय रुग्णसंख्या २५ झाली आहे.

सर्व रुग्ण घरीच

गेल्या आठवडाभरात दररोज रुग्ण समोर येत असले, तरी या रुग्णांमध्ये अगदीच सौम्य लक्षणे आहेत. सद्य:स्थितीत सक्रिय असलेले सर्व २५ रुग्ण घरीच विलगीकरणात असून, उपचार घेत आहेत. एकही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल नाही. त्यामुळे चिंतेचे कारण नसले, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT