रिक्षा लावण्यावरून दोन भावंडात जुंपली

दोन भावांसह कुटुंबियांमध्ये रिक्षा लावण्यावरून शिवीगाळ व मारहाण झाली.
fighting
fightingesakal

जळगाव : शिरसोली रोडवरील विनोबानगरात शेजारी राहणाऱ्या दोन भावांसह कुटुंबियांमध्ये रिक्षा लावण्यावरून शिवीगाळ व मारहाण झाली. उमेश लालसिंग परदेशी आणि निखिल लालसिंग परदेशी हे दोन्ही भाऊ शेजारी शेजारी राहतात.

सोमवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास निखिल परदेशी यांनी त्यांची रिक्षा घराच्या गेटसमोर पार्क केली. या कारणावरून शेजारी राहणारा भाऊ उमेश परदेशी आणि त्याची पत्नी मेघा परदेशी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, तर प्रतिकार म्हणून निखिल परदेशी आणि त्याची पत्नी अपेक्षा परदेशी यांनीही दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत दोन्ही कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसांत रात्री साडेदहाला तक्रार दिली. त्यावरून परस्पर विरोधात चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस नाईक नितीन पाटील तपास करीत आहे.

fighting
Jalgaon : बंद दुकान फोडून रोकड लांबविली
fighting
Jalgaon : पंधरा मिनिटांत हॉटेल कामगारांचे 4 मोबाईल लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com