जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट

जिल्ह्यात आतापर्यंत ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
water scarcity
water scarcityesakal

जळगाव : जिल्ह्यात पाऊस लांबल्याने पाणी टंचाई डोके वर काढू शकते. या विचाराने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सध्या दहा गावात नऊ टँकर सुरू आहेत. जिल्ह्यातील मोठ्या धरणात पाणीसाठाही कमी होत असल्याने आगामी दहा दिवसात पाऊस न झाल्यास पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

२०२१ मध्ये ११९ टक्के पाऊस झाला होता. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र जमिनीतील पाणीसाठाही वाढला होता. या मुळे पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या बोटावर मोजण्या एवढी होती. दरवर्षी पाणी टंचाईचे नियोजन जूनअखेरपर्यंत पाणी पुरेल असे केले जाते. जूनमध्ये पाऊस होऊन जलसाठ्यांमध्ये पाणी वाढेलच असे गृहित धरण्यात आले होते. यंदा मात्र २२ जून उजाडला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे जिल्ह्यातील मध्यम लघू प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास भूगर्भातील पाणी पातळी आणखी खालावेल व पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

water scarcity
100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये : कृषी विभाग

१० गावांत ९ टँकर सूरू
जिल्ह्यात सध्या दहा गावात ९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, हातगाव, वाघळी, तमगव्हाण, भुसावळ तालुक्यातील कंडारी, महादेव माळ, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी, पारोळा तालुक्यातील खेडी, हनुमंतखेडे या गावांचा सामावेश आहे.


जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील जलसाठा असा

धरणाचे नाव--आजचा जलसाठा-आजपर्यंतचा पाऊस--२०२१ चा पाऊस
हतनूर--१९.६९ टक्के--१०६--२० मिलिमीटर
गिरणा--३३.७९--७५--७३
वाघूर--६४.८३--०--१२१

water scarcity
खरिपाच्या पेरण्या 97 हजार हेक्टरवर पूर्ण

''जिल्ह्यात पाऊस लांबला असला तरी पाणी टंचाईची तक्रार मोठ्या प्रमाणात नाहीत. ७६ विहीरी आपण अधिग्रहीत केल्या आहेत. १० गावात ९ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. जून अखेरपर्यंत जर पाऊस झाला नाहीतर टंचाईची चिंता वाढेल.'' - अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com