Crime News esakal
जळगाव

Jalgaon : त्या मिस्त्रीच्या मृत्यूला जबाबदार घरमालकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गणेश कॉलनी भागातील चंद्रप्रभा आपार्टमेंटच्या बांधकाम साईटवर पाचव्या मजल्यावरून पडल्याने वृद्धाच्या मृत्यू झाला होता. शेख उस्मान शेख इस्माईल (वय ६०, रा. ख्वॉजामियॉनगर, हुडको, पिंप्राळा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. (crime against house owner responsible for death of mason Crime Latest Jalgaon News)

त्रिलोकी शर्मा यांच्या पाचव्या मजल्यावरील घराचे प्लॅस्टरचे काम सुरू होते. तेथे शेख उस्मान शेख इस्माईल बांधकाम मिस्त्री कामाला होते. ३० ऑगस्टला सकाळी अकराला पाचव्या मजल्याच्या भिंतीला प्लॅस्टर करताना शेख उस्मान शेख इस्माईल यांचा तोल जाऊन ते खाली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरवातीला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती.

मृत शेख उस्मान यांच्या नातेवाइकांनी आक्रमक भूमिका घेत बांधकाम करून घेणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने पोलिस नाईक महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (ता. १९) रात्री अकराला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संशयित त्रिलोकी शर्मा (वय ४७, रा. लक्ष्मीनगर, जळगाव) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

कुठल्याही सुरक्षेशिवाय काम

बांधकाम साईटवर पाचव्या मजल्यावर बांबुचे पालक बांधुन काम करत असतांना,शासनाने निर्धारीत करुन दिलेल्या सुरक्षा उपाय योजनांचा वापर करणे व सुरक्षा उपकरणे पुरवण्याची जबाबदारी संबधीत मालक व साईट इंजिनीयर, सुपरवायझर यांची आहे. असे असतांना कुठल्याही सुरक्षा उपाय योजना शिवाय काम करवुन घेत असतांना हि दुर्घटना घरुन मजुराचा मृत्यु झाल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT