Deadline for Kunbi and Maratha Kunbi caste documents  Sakal
जळगाव

Maratha Reservation : मराठा कुणबी जातीच्या दस्ताऐवजासाठी शुक्रवारपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : जळगाव शहर व जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज, पुरावे आहेत. ( Deadline for Kunbi and Maratha Kunbi caste documents is Friday jalgaon news)

त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात मंगळवारपासून (ता. २१) शुक्रवारपर्यंत (ता. २४) सादर करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीतर्फे प्राप्त निर्देशानुसार जळगाव शहर व जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावे, वंशावळ, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनद, राष्ट्रीय दस्तावेज अदी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात स्वीकारले जाणार असल्याची माहिती श्री. कासार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT