death
death  esakal
जळगाव

Jalgaon News : शेतकऱ्याने बांधावरच घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अलवाडी (ता. चाळीसगाव) येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. १२) सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (farmer hanged himself on field Jalgaon News)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

अलवाडी (ता. चाळीसगाव) येथे सुरेश राजधर बागूल (वय ४५) हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. त्यांच्याकडे ५ एकर शेती आहे.

बुधवारी (ता.१२) सकाळी साडेसातच्या सुमारास रवींद्र रामचंद्र बागूल हे शेतात वीजपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेताजवळील पप्पू पाटील यांनी सुरेश याने शेताच्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे सांगितले.

रवींद्र बागूल यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता सुरेश बागूल हे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर बागूल यांचा मृतदेह खाली उतरवून तो विच्छेदनासाठी मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला.

या प्रकरणी रवींद्र बागूल यांनी दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT