jalgao sakal
जळगाव

वनाधिकारी महाजनांवर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा

विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

रावेर: कामांची बिले पास करण्यासाठी एक लाख १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या येथील वन विभागातील(forest)अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित तक्रारदार हे औरंगाबाद जिल्ह्यातील(aurnagabad districts) असून, त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वन विभागाकडून रावेर तालुक्यात ए.एन.आर. रोपवनअंतर्गत चेनलिंक फेन्सिंग व गेटची तीन कामे ऑनलाइन ई-टेंडरिंगच्या माध्यमातून घेतली होती. त्यांपैकी पाल येथील काम पूर्ण केले आहे. या कामासाठी त्यांना दोन लाख ६० हजार रुपयांचा धनादेश मिळाला आहे. त्यानंतर लोहारा येथीलही काम पूर्ण झाले आहे.

मात्र, त्याचा धनादेश अद्याप मिळालेला नाही. या धनादेशाच्या मोबदल्यात वन परिक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (वय ४५, रा. रावेर) यांनी ५ टक्के कमिशनप्रमाणे एक लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर तक्रारदारांनी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी (ता. १८) सकाळी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, याबाबत मुकेश महाजन(crime news) यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की माझ्याविरुद्ध अॅन्टिकरप्शन विभागाकडून(acb) गुन्हा दाखल करण्यात आला असून नोटीस बजावण्यासाठी संबंधित अधिकारी आले होते. त्यांनी माझा जबाब घेतला असून, मी त्यांना पूर्णतः सहकार्य केले. सेशन कोर्टाने अटक करण्यासाठी मुदत दिलेली असल्याने मला अटक केलेली नाही. या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले असून, न्यायदेवतेवर (court )पूर्ण विश्‍वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Paper Leak: 'पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही'; PM मोदींची मोठी घोषणा, कठोर कायदा आणणार; व्हिडिओ संदेशात नेमकं काय सांगितलं?

Government talks CJP : सोनम वांगचुकनी उपोषण सोडल्यानंतर मोठी घडामोड! कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकार चर्चेला तयार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Spinach Cheese Sweet Corn Mini Paratha: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट! पालक-चीज-स्वीट कॉर्नचे मिनी पराठे एकदा नक्की ट्राय करा

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT