strike esakal
जळगाव

Jalgaon News : एकलहरे ग्रामपंचायतीत दस्तऐवजात खाडाखोड; दोषींवर कारवाईसाठी उपोषण

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील एकलहरे येथील ग्रामपंचायतीत मूळ गाव नंबर ८ मध्ये खाडाखोड करून क्षेत्र वाढविल्याचा आरोप निवृत्त तलाठी दयाराम पाटील यांनी केला आहे. (Indefinite hunger strike Retired Talathi Dayaram Patil front Tehsil office due to Mistakes documents in Eklahare Gram Panchayat jalgaon news)

या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

तालुक्यातील एकलहरे येथील ग्रामपंचायतीत मूळ गाव नंबर ८ मध्ये खाडाखोडप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार केली होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अमळनेर गटविकास अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या २०१८ पासून या प्रश्नांवर निवृत्त तलाठी दयाराम पाटील हे पाठपुरावा करत आहे. तहसील कार्यालयासमोर उपोषणस्थळी दयाराम पाटील यांना गावकऱ्यांसह ज्ञानेश्वर विनायक पाटील, अधिकार पाटील, समाधान पाटील, बळीराम पाटील, शिवाजी पाटील, सरपंच दिलीप पाटील आदींसह ॲड. दिनेश पाटील, रवींद्र पाटील, आर. बी. पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT