Jalgaon News : ‘यंत्रणे’ची ‘परीक्षा’च; एकाच आठवड्यात 3 निवडणुका

election
electionesakal

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राशी निगडित ३ निवडणुकींचे मतदान एकाच आठवड्यात होणार असून, यात अनेक मतदार हे तीन ठिकाणी मतदान करू शकणार आहेत. (Nashik Graduate Constituency Senate Secondary Higher Secondary Credit Bank Election same week Jalgaon news)

नाशिक पदवीधर मतदार संघ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट निवडणूक तसेच जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक पतपेढीची निवडणूक एकाच आठवड्यात होणार आहे.

सिनेटचे मतदान २९ जानेवारी, नाशिक पदवीधरचे मतदान ३० जानेवारी तर माध्यमिक पतपेढीचे मतदान ५ फेब्रुवारीला होणार आहे. जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे या तीनही निवडणुकांचे मतदार आहेत.

एकच मतदार तीन वेळा मतदान करणार असल्यामुळे प्रशासनाने मतदान झाल्याची खूण(शाई) लावण्यासाठी विशेष नियमावली तयार केली आहे. यामुळे मतदानात होणारा गैरप्रकार टाळण्यास मदत होईल.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

election
Jalgaon News : शिवाजीनगर पुलाचा ‘तिढा’ सर्वानुमते सोडवा; महामार्ग विभागाचे महापालिकेला पत्र

निवडणूक यंत्रणेची ‘परीक्षा’च

दरम्यान, अशा प्रकारे एकाच आठवड्यात तीन निवडणुकांचे मतदान होण्याची ही दुर्मिळ बाब असून, यातील बहुतांश मतदार तीनही निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यामुळे मतदान यंत्रणेला दक्ष राहून सर्व मतदान प्रक्रियेवर नजर ठेवावी लागणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले असून, पुरेपूर काळजी घेतली जात आहे. या तीनही निवडणुका म्हणजे एक प्रकारे निवडणूक यंत्रणेसह प्रशासनाच्या ‘परीक्षा’च असल्याने प्रत्येक टप्प्यावर नियोजन सुरू आहे.

मतदान नोंदविण्याआधी अशी लावली जाईल खूण

सिनेट निवडणूक (२९ जानेवारी) = उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोट

नाशिक पदवीधर निवडणूक (३० जानेवारी) = डाव्या हाताचे मधले बोट

माध्यमिक पतपेढी जळगाव = डाव्या हाताचा अंगठा

election
Jalgaon News : दोन दादांच्या भेटीने भुवया उचांवल्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com