Municipal Office
Municipal Office esakal
जळगाव

Jalgaon News : करवाढ नसलेल्या फैजपूरच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : फैजपूर नगरपालिकेचा सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा सुमारे ६० कोटी ४ लाख ५०हजार रुपयांचा व २ लाख २० हजारांचा शिलकीचा अंदाजपत्रकाला फैजपूर पालिकेच्या प्रशासक यांनी मंजुरी दिली. फैजपूर शहराच्या विविध भागाच्या पायाभूत विकास कामांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली असून विशेष करून कोणतीही करवाढ नसलेला अंदाजपत्रक असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा देणारा हा अंदाजपत्रक आहे.(Jalgaon Approval of Faizpur budget without tax increase)

फैजपूर पालिकेच्या २०२३-२४ या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रक प्रभारी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल महेश वतपाल यांनी तयार केलेला हा अर्थसंकल्प उपविभागीय अधिकारी तथा नगरपालिका प्रशासक देवयानी यादव यांनी मंजुरी दिली. सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकांनी अर्थसंकल्प मंजूर केला.

करवाढ नसलेला

दरम्यान अर्थसंकल्पात महसुली भांडवल जमा ६० कोटी ४ लाख ५० हजार सदरची रक्कम ही पालिकेच्या उत्पन्नातून जमा होईल. भांडवली जमा ४२ कोटी ९७ लाख ६० हजार दाखविली आहे, ही रक्कम विविध अनुदानाच्या माध्यमातून मिळणार असा अंदाज आहे. (latest marathi news)

खर्चाच्या बाजूच्या महसुली खर्चात कर्मचाऱ्यांचे पगार व इतर असे ६१ कोटी ४१ लाख ३५ हजार दर्शवले आहे. भांडवली खर्च ४२ कोटी ९७ लाख ६० हजार.या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची घरपट्टी नळपट्टी करवाढ सुचविलेली नाही. दरम्यान विविध प्रमुख योजनांसाठी तरतूद केलेली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी साडे पाच कोटी

स्वच्छ महाराष्ट्र अभियान साठी १ कोटी २० लाख. नगरोत्थान अनुदान १ कोटी २५ लाख.पंतप्रधान आवास योजना ५ कोटी रुपये,पंधरावा वित्त आयोग ३.५०,दलित वस्ती सुधारणा ७७ लाख,नागरी दलितेतर अनुदान १ कोटी.

रस्ता अनुदान ५.५० कोटी, विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान ५.५० कोटीची तरतूद करण्यात आलेली असून कोणतीही करवाढ नसलेला व नागरिकांना कोणताही भुर्दंड नाही असा दिलासा देणारा अंदाजपत्रक असून या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. यात फैजपूर शहरातील विविध विकास कामांसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT