Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Jalgaon Market Committee : जळगाव बाजार समिती सभापतिपदी ‘महाविकास’चे श्‍यामकांत सोनवणे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी महाविकास आघाडीचे श्‍यामकांत सोनवणे विजयी झाले. महाविकास आघाडीचे लक्ष्मण पाटील ऊर्फ लकी टेलर यांचा त्यांनी पराभव केला, तर उपसभापतिपदी पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

सभापतिपदासाठी महाविकास आघाडीतच जोरदार राडा झाला. विशेष म्हणजे विरोधी भाजपनेही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान केले.

महाविकास आघाडीच्या दोन व शिंदे गटाच्या एका संचालिकेनेही मतदान केले नसल्याचे पीठासीन अध्यक्षांनी सांगितले. ( Jalgaon Bazar Committee Chairmanship Shyamkant Sonawane of Mahavikas Pandurang Patil as Deputy Chairman Jalgaon News)

जळगाव बाजार समिती सभापती निवडीसाठी बाजार समितीच्या संचालक मंडळ सभागृहात विशेष सभा झाली. तालुका उपनिबंधक (सहकार) के. डी. पाटील पीठासन अध्यक्ष होते. सभापतिपदासाठी महाविकास आघाडीचे श्‍यामकांत सोनवणे, लक्ष्मण पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.

भाजप व शिंदे गटातर्फे प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता. यात भाजप-शिंदे गटाचे प्रभाकर सोनवणे यांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे श्‍यामकांत सोनवणे व लक्ष्मण पाटील यांच्यात लढत झाली.

पीठासन अध्यक्षांनी हात उंच करून मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यात श्‍यामकांत सोनवणे यांना पंधरा, तर लक्ष्मण पाटील यांच्यासह ‘मविआ’च्या दोघांनी व शिंदे गटाचा एक संचालक अशा तिघा जणांनी मतदान केले नाही. भाजप संचालकांनीही सभापतिपदासाठी श्‍यामकांत सोनवणे यांना मतदान केले. सभापतिपदी श्‍यामकांत सोनवणे यांची निवड पीठासीन अध्यक्षांनी घोषित केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उपसभापती बिनविरोध

उपसभापतिपदासाठी पांडुरंग पाटील (धानवड) यांनी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजप-शिंदे गटातर्फे प्रभाकर सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी माघार घेतली. त्यामुळे उपसभापतिपदी पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

‘महाविकास’ चा वाद

महाविकास आघाडीचे उमेदवार लक्ष्मण पाटील व श्‍यामकांत सोनवणे यांच्यात वाद झाला. लक्ष्मण पाटील यांनी ही निवडणूक पूर्णपणे हुकूमशाही पद्धतीने झाल्याचा आरोप केला, ही निवडणूक रद्द करण्याचीही मागणी त्यांनी केली. महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर व नवनिर्वाचित सभापती श्‍यामकांत सोनवणे यांनीही हा दावा फेटाळून लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT