Citizens of Pailad area participating in protest held in premises of municipal office.
Citizens of Pailad area participating in protest held in premises of municipal office. esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेर पालिकेवर नागरिकांचा मोर्चा; पुरातन वर्णेश्‍वर मंदिरासह रस्ता वगळल्याचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहराच्या नवीन विकास आराखड्यातून पुरातन वर्णेश्‍वर मंदिर आणि रस्ता वगळून त्या ठिकाणी ‘ग्रीन झोन’ केल्याच्या निषेधार्थ भाविकांसह परिसरातील रहिवाशांनी पालिकेवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. १९९४ साली नगरविकास आराखड्यात तीर्थक्षेत्र वर्णेश्वर मंदिर व रस्त्याची नोंद असताना शहराच्या नवीन विकास आराखड्यातून हेतुपुरस्सर ते वगळण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून पुरातन काळातील मंदिर वगळणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (Jalgaon Citizens march on Amalner Municipality)

येथील नगरपालिकेने नवीन आराखड्यात पुरातन वर्णेश्‍वर मंदिर आणि रस्त्याचा भाग ‘ग्रीन झोन’ दर्शविलेला आहे. ज्या समाजाचे अंत्यसंस्कार होत नाहीत, त्यांचा दफनविधी त्यांचे अंत्यसंस्कार गट नंबर ४१४ आणि गट नंबर ४१५ मध्ये होतात. हा भाग बोरी नदीच्या पूर नियंत्रण रेषेत येतो.

त्यामुळे हा भाग जमिन, रहिवास, ग्रीन झोन होऊच शकत नाही. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी वगळलेले मंदिर पुन्हा आराखड्यात घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सकाळी वर्णेश्‍वर भक्तांनी पैलाड भागातून मोर्चा काढून नगरपालिकेच्या ओट्यावर ठिय्या मांडला. (latest marathi news)

यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, माजी नगरसेवक संजय पाटील, चंद्रकांत कंखरे, पंकज भोई, मनोज शिंगाणे, राहुल कंजर, महेंद्र शाह, योगेश जाधव, मयूर पाटील, संजय शुक्ल, दीपक पाटील, सतीश धनगर, योगेश धनगर.

विनोद विसपुते, महेश कोठावदे, जितेंद्र पाटील, अतुल देसाई, रवी घोगले, हर्षल ठाकूर, मुकेश वाल्हे, सुशांत पाटील, नितीन देसले, सोपान पाटील, राकेश पाटील, मनोज धनगर व रहिवासी उपस्थित होते.

मुख्याधिकाऱ्यांचे आश्‍वासन

दरम्यान, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांची मागणी जाणून घेतली. या संदर्भात तातडीने मंत्रालयात पत्र पाठवून पूर्वीप्रमाणे नोंद करण्यासंदर्भात व्यवस्था करतो, असे आश्वासन दिले.

त्यांनतर भक्तांनी आपला मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाकडे वळवला. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी देखील मुख्याधिकारी नेरकर यांना या मागणीसंदर्भात तातडीने दखल घेण्याबाबत योग्य त्या सूचना केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT