Fraud Crime
Fraud Crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : बिल्डरने पावणेचार कोटीला फसवले; गाळे दुसऱ्यालाच विकले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : शहरातील खानदेश मिल कंपाउंडमधील संत हरदासराम कॉम्प्लेक्स सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बिल्डर आणि जागामालकांच्या वादानंतर आता बिल्डरने गाळ्यापोटी पावणेचार कोटी घेत ते गाळे वेगळ्याच लोकांना विक्री केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. के. पी. इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक खुबचंद साहित्या यांच्यासह मुलगा नितीन, भाऊ अनिल आणि वहिनी ममता अशा चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Fraud builder cheated 4 crore)

महेंद्र रोशनलाल नाथानी (वय ५०, रा. गणेशनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महेंद्र यांचे फुले मार्केटमध्ये ज्योती मेन्स वेअर नावाने रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. फुले मार्केट व महापालिका यांच्यात कायदेशीर लढा सुरू असून, दुकान केव्हाही खाली करावे लागू शकते, या भीतीने नाथानी बांधवांनी नव्या जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार के. पी. इन्फ्रास्ट्रक्चर या बिल्डर डेव्हलपर्स संस्थेतर्फे खानदेश मिल कंपाउंडमध्ये संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाचे काम सुरू असल्याने तेथे गाळे घेण्यासाठी महेंद्र व आनंद यांनी खुबचंद साहित्या यांना संपर्क केला.

स्वतः खुबासेठची ऑफर

खुबचंद साहित्या ऊर्फ खुबासेठ यांनी नाथानी बांधवांच्या दुकानावर जाऊन त्यांची भेट घेतली. जागेचा सातबारा उतारा दाखवून जमीन खरेदीनंतर येथे कॉप्लेक्सची उभारणी होणार असून, गाळे बुकिंग करून घ्या, अशी चर्चा झाल्यावर दोघा नाथानी बंधूंनी हॉटेल के. पी प्राइड येथे जाऊन खुबचंद साहित्या, अनिल साहित्या, ममता साहित्या आणि नितीन या चौघांची भेट घेतली.

सात कोटी ३२ लाखांत सौदा

ठरल्याप्रमाणे दोन्ही भावंडांच्या गरजेनुसार सात कोटी ३२ लाख ६० हजारांत सौदा ठरल्यावर या मालमत्तेवर दहा टक्के सूटचे आमिष देत सहा कोटी ६० लाखांत सौदा निश्‍चित झाला होता. ५० टक्के बयाणा देण्यासह ३६ महिन्यांच्या आत खरेदीची अट असल्याने महेंद्र नाथानी यांनी ७५ लाख व त्याच्या भावाने ७० लाख अशी रक्कम संबंधितांच्या खात्यात ‘आरटीजीएस’द्वारे जमा केली होती. (latest marathi news)

नंतर जमीन विकून एकूण तीन कोटी ७५ लाख रुपये दिल्यावर दोघा भावंडांनी सौदा पावतीसाठी तगादा लावला होता. मात्र, आपण एका जातीचे व्यापारी बांधव विश्वास ठेवा, असे म्हणत साहित्या यांनी वेळ मारून नेली.

स्टॅम्पही करून दिला

सौदा पावतीचा तगादा लावल्यावर (१६ नोव्हेंबर २०१८) रोजी हॉटेल के. पी. प्राइड येथील कार्यालयात खुबचंद साहित्या यांनी तडक जितेंद्र मंधान यांच्याहस्ते प्रत्येकी ५०० रुपयांचे चार स्टॅम्प पेपर मागवून एक कोटी ४५ लाख आणि एक कोटी ७८ लाख अशी रक्कम सहा महिन्यांत रोखीने परत करेल, असे लेखी आश्वासन लिहून दिले.

हा दस्त केवळ समाधानासाठी करून देत असून, आम्ही तुम्हाला खरेदी ठरल्याप्रमाणे करून देऊ, असे सांगितले. मात्र त्यानंतर आजपर्यंत संबंधितांना खरेदीही दिली नाही किंवा रक्कमही परत न केल्याने ९ फेब्रुवारीस २०२४ रोजी दोघा भावंडांनी साहित्या यांची भेट घेतली असता तेथे शिवीगाळ करून पिटाळून लावल्याचे तक्रारीत नमूद आहे.

वेगळ्याच लोकांना दुकाने विक्री

सौदा ठरल्याप्रमाणे खुबचंद साहित्या यांनी संत हरदासराम मार्केटमधील गाळा नंबर ३८ ते ५१ नाथानी भावंडांना नावावर करून देणे अपेक्षित होते. मात्र, ही सर्व दुकाने सीमा राहुल परकाळे, अतुल किसनदास तोतला आणि पंकज किसनदास जेसवानी यांना विक्री केल्या असून, तसा दस्त उपनिबंधक कार्यालयातून करण्यात आला आहे.

परिणामी, आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर महेंद्र नाथानी यांनी शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून खुबचंद साहित्या (वय ५६), अनिल प्रेमचंद साहित्या (वय ४८), ममता अनिल साहित्या (वय ४६), नितीन खुबचंद साहित्या (वय ३६) अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT