Tondapur Illegal felling of trees in the area
Tondapur Illegal felling of trees in the area esakal
जळगाव

Jalgaon News : गोद्री वनक्षेत्रात अंजनाच्या वृक्षांची अवैध कत्तल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तोंडापूर परिसरात बऱ्याच दिवसापासून सर्रासपणे अवैधरीत्या वृक्षांची कत्तल सुरु आहे. भर उन्हाळ्यात सुरु असलेल्या या कत्तलीकडे वनविभागासह प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. संबंधित वृक्षांची कत्तल करून वीटभट्यासह वापरला जात असल्याच्या चर्चा आहे. तोंडापूर परिसरातील धरणालगतच्या जागांवर तोडलेल्या मोठ मोठ्या वृक्षांचे ढीग लागले असून त्यात मोठ्या प्रमाणात जंगलातील अंजन. (Jalgaon Illegal felling of Anjana trees in Godri forest area)

कडुनिंब, बेहडा, पळस, बाभूळ, काटेरी आंबा आदींसह मोठमोठ्या वृक्षांचा समावेश आहे. सर्रासपणे सुरु असलेल्या या अवैध वृक्षतोडीमुळे तोंडापूर परिसरातील शेतशिवार व जंगल भकास होत आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष

अवैध वृक्षतोडीत नियमित झाडाशिवाय अनेक महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या औषधी तसेच जनावरांना पोषक असलेला हा जंगलातील अंजन वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आहे. वनविभागाकडून येथील जंगल संरक्षणाकडे लक्ष दिले जात नसल्याने वृक्षतोडीला लगाम बसत नसल्याची या भागातील नागरिकांची भावना आहे.

स्थानिक वृक्षप्रेमींच्या तशाच तक्रारी आहेत. तोंडापूर परिसराला अजिंठा डोंगररांगजवळ असल्याने अंजनाचे झाडे ही फक्त वनविभागाचे डोंगराच्या रांगामध्ये संख्या बोटावर मोजता येईल इतकी च शिल्लक राहिली आहे त्यात हि अंजन नामशेष होण्याच्या मार्गावर असताना मात्र तोंडापूर येथे लाकूड व्यापारी मात्र सर्रासपणे जंगलातून अंजनाच्या लिंबाच्या आंबा पळस झाडाची कत्तल करून वाहन भरभरून वाहून नेले जात असूनही याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.

वीटभट्यांचे अर्थकारण

तोंडापूर परिसरात चाळीसच्या जवळपास विटभट्या आहे. यातील बहुतांश वीट भट्यांचे अर्थकारण या भागातील अवैध वृक्षतोडीवर अवलंबून असल्याचे बोलले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होत असल्याने बहुतांश अवैधपणे तोडलेला लाकूडफाटा हा वीटभट्यासाठीच वापरला जात असल्याच्या तक्रारी आहेत. (latest marathi news)

दिवसाला चार ते पाच ट्रॅक्टर लाकडाची वाहतूक होत असते. अशा या भागातील विट भट्यावर लाकडाचे मोठ मोठे ढिग लागले आहे. धरणाच्या परिसरात जागोजागी लिंबाचे अंजनाचे लाकडाचे साठे साठवून ठेवल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. वनविभागाचे कर्मचारी नियमितपणे फिरत असूनही अवैध वृक्षतोडीविषयी त्यांच्याकडून चकार कारवाया होत नसल्याचे दिसून येते.

अवैध वृक्षतोड

जामनेर तालुक्यातील गोद्री वनपरिश्रेत्रात तोंडापूर मांडवे ढालगाव भारुडखेडा कुंभारी बु कुंभारी खुर्द या गावाचा समावेश असून या गावा च्या परिसरातील जंगल अवैध वृक्षतोडीमुळे भकास होत आहे. वन्यप्राणी पासून पिकाचे होणारे नुकसान टाळण्याच्या नावाखाली विनापरवानगी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे लाकूड फाटा व्यापाराला मात्र सुगीचे दिवस आले आहेत.

शेतकऱ्यांच्या बांधावरील परस्पर तोडल्या जाणाऱ्या वृक्षांची तर या भागात दखलही घेतली जात नाही. जिथे स्वतंत्र विभाग असलेल्या वन विभागाचे जंगल सुरक्षित नाहीत. तेथे वैयक्तीक वृक्षतोडीची दखल घ्यायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे निदान अंजनासारख्या महत्त्वाच्या वृक्षतोडीची तरी वनविभाग गंभीरपणे चौकशी करील का ? अशी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT