Jalgaon mahasanskruti mahotsav (file photo)  esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावमध्ये आजपासून महासांस्कृतिक महोत्सव

Jalgaon News : जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागातर्फे बुधवारपासून (ता.२८) ते ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक विभागातर्फे बुधवारपासून (ता.२८) ते ३ मार्च या कालावधीत महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची तयारी आज पूर्ण करण्यात आली आहे.

पोलिस कवायत मैदानावर सायंकाळी साडेपाचला उद्‌घाटन होईल. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन होईल. (Jalgaon mahasanskruti mahotsav)

खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार एकनाथराव खडसे आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. जळगावकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक एम्‌. रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केले आहे.

पहिल्या दिवशी बुटगुंडा, भारुड, पारंपरिक गीते सादर होतील. जिजाऊंच्या लेकी पोवाडा, शिवकालीन लोक कला, करपावली सादर होईल. सायंकाळी साडेसातला महाराष्ट्राची हास्ययात्रा’ सादर होईल. (Latest Marathi News)

२९ फेब्रुवारीस सायंकाळी साडेपाचला पारंपरिक लोक कला, नृत्य कक्कर, शिवकालीन मर्दानी खेळ, लोकनाट्य - किंगरी सादर होईल. महोत्सवात पाचही दिवस ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महिला बचतगटांचा सरस महोत्सव होईल

२९ रोजी डॉ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित आयुष्यावर बोलू काही, १ मार्चला सन्मीता धापटे-शिंदे, चैतन्य कुलकर्णी प्रस्तुत ‘सुरसंस्कृती’, २ मार्चला महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारा ‘गर्जा सुवर्ण महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. ३ मार्च रोजी मुंबई साहित्य संघ निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT