Jalgaon Municipal Corporation latest marathi news esakal
जळगाव

जळगाव : शिवाजीनगर ‘टी’ पुलाच्या कामाला महापालिकेचा हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवाजीनगर पुलाचे ‘टी’ काम आपण सुरू करावे, त्या ठिकाणी अतिक्रमणाची (Encroachment) कोणतीही अडचण नाही असे महापालिकेने (JMC) सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले आहे. (Jalgaon Municipal Corporations green signal for Shivajinagar T bridge work Latest jalgaon news)

शिवाजीनगर पुलाचे ‘टी’आकाराचे काम अद्याप होणे बाकी आहे. पुलाचा एक भाग फेडरेशनकडे जात असून त्यातील एक भागाचे वळण शिवाजीनगर भागाकडील टी. टी. सांळुखे चौकाकडे आहे. या कामासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी मंजूर केला आहे.

मात्र या रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे ते काढून द्यावे असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेस दिले होते. मात्र महापालिकेने गेल्या अनेक दिवसांपासून त्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे या पुलाच्या ‘टी’ आकाराचे कामही रखडले होते.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राची दखल घेतली आहे. महापालिकेचे शहर अभियंता एम. जी. गिरगावकर यांनी नुकतीच शिवाजीनगर भागातील या पुलाच्या बांधकाम करण्याच्या भागाची पाहणी केली.

या रस्त्यावर जास्त अतिक्रमण नाही, केवळ दोन अतिक्रमण असून तेही काढून घेण्यात येत आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागाकडील ‘टी’ आकाराचे काम आपण सुरू करावे असे कळविण्यात आले असल्याची माहिती श्री. गिरगावकर यांनी दिली आहे.

त्यामुळे आता ‘टी’ आकाराच्या कामाचा चेंडू पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेला आहे. ते काम सुरू करण्याचे आदेश मक्तेदाराला देतात याकडेच लक्ष असणार आहे. मात्र या पुलाच्या एल आकाराचे काम संथ गतीने सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : टीव्हीके-काँग्रेस आघाडीला नवीन नाव

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT