Jalgaon : आनंदाच्या क्षणी दुःखाचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalgaon : आनंदाच्या क्षणी दुःखाचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर sakal media
जळगाव

Jalgaon : आनंदाच्या क्षणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा

सावदा : रोजी मोठे वाघोदा येथील सुपे कुटुंबातील मुलाच्या लग्नाचे रिसेप्शन त्याची जय्यत तयारी ही सुरू. कुटुंबात आनंदी आनंदचे वातावरण आणि खरेदी साठी सुपे कुटुंबातील काही जण जळगाव येथे आपल्या चार चाकी वाहनातून जात असताना सावदा- पिंपरुळ दरम्यान ता.2 रोजी सकाळी 10 चे सुमारास त्यांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन मोठा वाघोदे येतील सुपे कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य दोघे जखमी झाले. मुलाचे लग्नानिमित्त रिसेप्शन म्हणून आनंदाचे क्षण काही तासांवर येऊन ठेपले असताना सुपे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.या अपघातात भावना भरत सुपे वय 45 या ठार झाल्या आहेत.

प्रगतशील शेतकरी कै. वसंतराव सुपे यांचे सुपुत्र माजी पंचायत समिती उप सभापती केळीचे व्यापारी भरत सुपे यांचे सुपुत्र पियूष यांचा लग्न निमित्त सावदा येथील विश्राम गृह समोर 5 रोजी रिसेप्शन सोहळा होता. शामियाना उभारून त्याची जय्यत तयारी देखील सुरू होती. परिवारात शुभ कार्यक्रम असल्याने सर्वच जण आनंदी होते आणि खरेदी ची लगभग सुरू होती. सुपे कुटुंबातील सौ.भावना भरत सुपे, मुलगा क्रिष्णा सुपे, मोठी आई विद्या सुपे असे एकूण 4 ते 5 जण आपल्या वाहन क्रमांक. DL10CE 6165 ने जळगाव येथे जात असताना पिंपरूड रस्त्यावर चालक क्रिष्णा सुपे याचा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने त्याचे वाहन त्याच वेळी रस्त्यावरून जाणारे दुसरे वाहन क्रमांक . MH19AP2612 ला घासून पलटी झाले. यात भावना सुपे या गंभीर जखमी होऊन ठार झाल्या. तर विद्या काशिनाथ सुपे, क्रिष्णा सुपे यांच्यासह दोन्ही वाहनातील 5 ते 6 जण जखमी झाले.

यावेळी रस्त्यावरून साव द्याकडे जाणारे सकाळ चे बातमीदार मिलिंद टोके आणि जळगाव पोलिसांचे आरसीबी प्लाटून हे पिंपरुड महामार्गावरून सावदा मार्ग रावेर येथे जात होते. त्यांना अपघाताचे दृष्य नजरेस पडल्याने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या पोलीस व्हॅन मधे जखमींना तात्काळ दवाखान्यात भरती केल्यामुळे त्यांचा जीव वाचला. यामुळे जळगाव पोलिसाच्या आरसीबी प्लाटून चे कौतुक केले जात आहे. देखील स्तुती केली जात आहे. या अपघातात वाहनांचे ही मोठे नुकसान झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की वाहने रस्त्याचे बाहेर शेतात जाऊन पलटी झाले आणि चक्काचूर झाली.

योगीराज सुपे यांनी सावदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की क्रीष्णा सुपे याने त्याचे ताब्यातील फॉर्च्युनर कार क्र . DL 10 CE 6165 हि सावदा कडून जळगाव कडेस भरधाव वेगात जावून रस्त्याचे परिस्थितीकडेस दुर्लक्ष करुन जात असताना, त्याचे पुढे जात असलेली इंडीका कार क्र . MH 19 AP 2612 हिस हयगईने व अविचाराने ओव्हर टेक करुन त्याचा त्याचे वाहनावरील ताबा जावून सदर वाहन धडक देवून पुढे जावुन गाडी पलटी झाली. व अपघातातील मयत आई व नातेवाईक आणि इंडिका गाडीतील रावेर येथील व्ही एस नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परिवारातील रेखा हेमंत नाईक ( ४० ) प्रतीक हेमंत नाईक ( २० ) प्रीती हेमंत नाईक ( १८ ) तिघे राहणार रावेर यांचे दुखापतीस तसेच दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झालेला आहे. म्हणुन फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डी डी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान गायकवाड तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: ...अन् बदलला अल्पवयीन गुन्ह्याचा कायदा; पोर्शे प्रकरणात फडणवीसांनी दिला निर्भया केसचा संदर्भ

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Indigo Flight : इंडिगोची फ्लाइट की रेल्वेचा जनरल डबा! ओव्हरबुक झाल्याने प्रवाशाचा उभे राहून प्रवास, अखेर...

Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीला शिक्षा होणार का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत

Gautam Gambhir: 'धोनी ज्याप्रकारे स्पिनर्सचा...', चेन्नई-कोलकाता लढतीबद्दल गौतम गंभीर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT