Nosebleed esakal
जळगाव

Jalgaon Summer : बदलत्या हवामानाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम; नाकातून रक्तस्रावासह विविध विकार

Jalgaon Summer : बदलत्या तापमानामुळे शरीराच्या तापमानातही बदल होतात. अशा वेळी पचायला हलके, असे अन्नपदार्थ लहान मुलांना द्यावे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer : लहान मुलांमध्ये उन्हाळ्यात अनेक शारीरिक समस्या जाणवतात. त्यात मुख्यत्वे करून नाकातून रक्तस्राव होणे, याचे प्रमाण मोठे असून पालकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतली तर वाढणारा हा विकार कमी होण्यास मदत होत असल्याचे विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ. भूषण चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

बदलत्या तापमानामुळे शरीराच्या तापमानातही बदल होतात. अशा वेळी पचायला हलके, असे अन्नपदार्थ लहान मुलांना द्यावे. (Jalgaon Summer Impact of climate change on childrens health)

त्यात मुख्यतः फळ जसे टरबूज, खरबूज, काकडी, आंबा, आवळा, तांदळाची खीर, मुगाची खिचडी, नारळपाणी, लिंबूपाणी, दही, ताक, स्वच्छ उसाचा रस, कैरीचे पन्हे, तसेच उन्हाळ्यात मुख्यतः तळलेले व मसाल्याचे पदार्थ देणे टाळावे. त्याने पोटाचे विकार उद्भवू शकतात.

उन्हाळ्यात सामान्यतः वाढत्या तापमानामुळे गरम व कोरडी हवा नाकातील लहान रक्तवाहिन्यांना इजा पोचविण्याची शक्यता असते व तसेच वारंवार नाक कोरल्यामुळे नाकातून रक्तस्राव उन्हाळ्यात होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये अधिक आढळते.(latest marathi news)

अशावेळी लहान मुलांना घराबाहेर काढणे टाळावे व खूपच आवश्यकता असल्यास डोक्यात टोपी व नाका तोंडावर स्वच्छ कॉटनचा रुमाल बांधावा. जेणेकरून गरम व कोरडी हवा नाकात शिरकाव करण्यापासून टाळता येऊ शकते.

"बदलत्या हवामानाचा मुलांवर विपरित परिणाम होतो. मात्र पालकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी."- डॉ. भूषण चव्हाण, बालरोग तज्ज्ञल, विघ्नहर्ता हॉस्पिटल, पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT