A mangalsutra, a woman's anklet and a Rs 20 coin were found at the scene of the murder
A mangalsutra, a woman's anklet and a Rs 20 coin were found at the scene of the murder esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ‘ती’च्यासोबत सापडताच एका वारमध्ये गार; कुऱ्हाड मारल्यावर डोक्याला बांधला शर्ट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : आव्हाणे रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंगच्या मागील शेतशिवाराचा परिसर तसा निर्मनुष्य असतो. फारस कुणाचे येणे-जाणे नसल्याने काही वेळा परप्रांतीय जोडपी आढळूनही आली आहेत. मृत सुरेश सोलंकी याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंधाचीही चर्चा असून, तो तिच्यासोबत सापडल्याने ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात आहे. (Jalgaon Crime News)

आव्हाणे रस्त्यावर अनेक बागायतदार शेतकऱ्यांचे मळे आणि शेत असून, बहुतांश ठिकाणी परप्रांतीय मजूर कामाला आहेत. लक्ष्मी जिनिंगमध्ये कंत्राटदाराकडून कामावर ठेवले जाणारे मजूरही सर्वच परप्रांतीय असून, जवळच या मजुरांच्या राहण्याची व्यवस्था आहे. सुरेश सोलंकी एका खोलीत वास्तव्यास हेाता.

त्याची मुकादम मनोज सोनवणे यांच्याशी शनिवारी (ता. २०) दुपारी शेवटची भेट झाली. त्यानंतर तो त्याला न भेटल्याने सोनवणे त्याचा शोध घेण्यासाठी ओळखीच्या मजुरांना विचारपूस करीत होता. अशातच जिनिंगच्या मागील शेतात सुरेशचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

नुकताच मोबाईल घेतला

सुरेश सोलंकी याने एक-दोन दिवसांपूर्वीच ॲन्ड्राईड मोबाईल खरेदी केला हेाता. त्या मोबाईलमध्ये व्हॉट्‌सॲप आणि फेसबुक सुरू करण्यासाठी त्याने मोबाईल मुकादम मनोज सोनवणे यांच्याकडेच दिला होता. मनेाजने हा मोबाईल पोलिसांच्या स्वाधीन केला.

‘ती’च्यासोबत असताना वार

घटनास्थळावर पोलिसांना महिलेच्या पायातील एक पैंजण, जोडवे, गळ्यातील मंगळसूत्र, असा ऐवज मिळून आला असून, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मृत सुरेश सोलंकी त्या महिलेसोबत असताना, मारेकऱ्याने त्याच्यावर पाठीमागून डोक्यावर वार केल्याने त्याला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

‘एक फुल दो माली’

मृत सुरेश सेालंकी याचे एका महिलेशी मैत्री होती. त्याच महिलेसोबत त्याच्या मित्राचेही संबंध असल्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक परप्रांतीय महिला व त्याच्या मित्राला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून, दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

डोक्याला बांधला शर्ट

मृत सुरेश सोलंकी याच्या डोक्याला अंगातील शर्ट घट्ट बांधला होता; जेणेकरून रक्तस्त्राव थांबेल. जवळच शेताच्या बांधाजवळ त्याच्यावर कुऱ्हाडीसारख्या हत्याराने हल्ला केल्यानंतर मारेकरी किंवा त्याच्यासोबतच्या महिलेने त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागल्याने रक्त थांबविण्यासाठी बांधला असावा.

आणि त्याला जवळच कडबा ठेवलेल्या ताडपत्रीवर आणला असावा, असा अंदाज व्यक्त होतोय. मात्र, एकाच वारमध्ये सुरेशची कवटीच फुटल्याने अतिरिक्त रक्तस्त्राव होऊन, तो मत झाल्यावर संबंधितांनी येथून पळ काढल्याचे बोलले जात आहे.

खून प्रकरणात एक अटकेत

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे रोडवरील लक्ष्मी जिनिंगच्या मागील शेतात सुरेश परमसिंग सोलंकी (वय २६, रा. खेमला, ता. सेंधवा, ता. बडवाणी मध्य प्रदेश) या परप्रांतीय कामगाराचा अनैतिक संबंधातून खून केल्याच्या शनिवारी घडलेल्या घटनेत रामलाल नाना बारेला (रा. केरमला वलवाणी, ता. वरला जि. बडवानी, मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित रामलाल नाना बारेला याला शनिवारी रात्री उशीरा अटक केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक महेश शर्मा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT