Water Supply
Water Supply  esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : शहराचा पाणीपुरवठा लांबला; तापी नदीत अत्यल्प पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या तापी नदीतील डोहातील पाणी आटल्याने आधीच लांबलेला पाणीपुरवठा विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केले आहे. तापी नदीवरील जळोद डोह आटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, कलाली डोहातून ६५ अश्वशक्तीचे तीन पंप सुरू करण्यात आले आहेत. (Jalgaon Water Scarcity City water supply delayed Tapi River has low water storage)

तसेच गंगापुरी डोहातून चारी खोदून पाणी जळोद डोहात आणले जात आहे. मात्र गंगापुरी डोहातील पाण्याची पातळी देखील खोल जात असल्याने नगरपालिकेतर्फे आणखी खोल चारी करून उर्वरित पाणी साठा जळोद डोहाकडे वळविला जात आहे. यावर्षी पाणीटंचाईची परिस्थिती पाहून आहे तेवढ्या पाण्यात काटकसर करीत एक, दोन दिवस उशिराने पाणीपुरवठा लांबविला गेला.

मात्र महिन्याभरापासून तांत्रिक अडचणी उदभवल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा दहा ते तेरा दिवसांनी होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. कलाली येथून पर्यायी पाणीपुरवठा केला जात असला तरी एकदा गार्डिंग चिकटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने जंपर तुटला.

दुसऱ्या दिवशी पुन्हा वीज खंडित करून काम करण्यात आले. आणखी एक दिवस वीजपुरवठा खंडित झाला म्हणून जलकुंभ वेळेवर भरल्या गेल्या नाहीत विलंब झाला आणि नागरिकांना पाणी मिळण्यास आणखी उशीर झाला. (latest marathi news)

"आवर्तन घेतल्यास ते एक ते सव्वा महिनाच टिकते आणि जुलैपर्यंत टंचाईवर उपाययोजना करायची असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे. तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने टाक्या भरण्यास अडचण आली. याबाबत ‘महावितरण’शी पत्रव्यवहार केला आहे." - तुषार नेरकर, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद

हंडा मोर्चा काढण्याचा इशारा

दरम्यान, शहरातील अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने आजी, माजी नगरसेवक प्रशासनाला जबाबदार धरत असून, काहींनी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यातच रमजान, गुढी पाडवा, तसेच मुलांना सुटी असल्याने प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची वर्दळ आहे. जास्त पाण्याची गरज असताना आठ, दहा दिवस पाणी मिळत नाही.

अधिकारी, कर्मचारी, व्हॉलमन यांच्यात ताळमेळ नसल्याने कधी कमी दाबाने, कधी रात्री, कधी सकाळी पाणीपुरवठा करतात. विचारल्यावर उर्मट उत्तरे देतात. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे यांना निवेदनाद्वारे मोर्चाचा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT