By opposing filling of water from acquired wells  Standing Tanker.
By opposing filling of water from acquired wells Standing Tanker. esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : 18 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; प्रशासनातर्फे 27 विहिरी अधिग्रहित

सकाळ वृत्तसेवा

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यातील अनेक गावांत एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच दुष्काळाची भीषण परिस्थिती जाणवू लागली असून, १८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनातर्फे २७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. अमळनेर तालुक्यातून तापी, बोरी व पांझरा नद्या वाहतात. मात्र, सिंचनाबाबत तालुका अजूनही तहानलेलाच दिसून येत आहे. (Jalgaon Water Scarcity Water supply to 18 villages through tankers)

तापी नदीवरील निर्माणाधिन असलेला पाडळसरे प्रकल्प सोडला, तर दुसरा एकही सिंचन प्रकल्प तालुक्यात नाही. बोरी व पांझरा नदीवर साठवण व केटी वेअर बंधारे असले, तरी उन्हाळ्यात बहुतांश बंधारे कोरडेठाक पडलेले दिसून येत आहेत.

या वर्षी कमी पाऊस झाल्याने एप्रिलमध्येच पाणीटंचाई जाणवू लागली असून, मे महिन्यात दुष्काळाची दाहकता वाढण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील खालील गावांना प्रत्येकी १२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

गावे नावे व कंसात टँकरची संख्या

निसर्डी (१), लोणपंचम (१), शिरसाळे (२), तळवाडे (२), नगाव (२), आर्डी-अनोरे (२), लोण बुद्रुक (१), नगाव खुर्द (१), देवगाव देवळी (२), पिंपळे खुर्द व चिमनपुरी (२), डांगर बुद्रुक (४), भरवस (३), अंचलवाडी (१), आटाळे (१), सबगव्हाण (१), लोणचारम तांडा (१), पिंपळे बुद्रुक व गलवाडे बुद्रुक (प्रस्तावित). या १८ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. (latest marathi news)

तालुक्याचा पश्चिम भाग होरपळतोय

तालुक्यातील पश्चिम भागात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी लागणाऱ्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न भविष्यात उद्भवणार आहे. पिंपळे, चिमनपुरी, आर्डी, अनोरे, अंचलवाडी, आटाळे, डांगर, तळवाडे शिरसाळे या गावांमध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दुभती जनावरे सांभाळताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे.

टँकरची संख्या वाढू शकते

एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत तालुक्यातील अजून काही गावांकडून टँकरचे प्रस्ताव येण्याची शक्यता असल्याने टँकरची संख्या वाढू शकते. त्यातच अधिग्रहित केलेल्या काही विहिरींनी तळ गाठला आहे, तर काही ठिकाणी नागरिकांकडून अधिग्रहित केलेल्या विहिरीतून टँकर भरण्यास विरोध होऊ लागल्याने ऐन मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य अजून जाणवू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT