missing esakal
जळगाव

Jalgaon Crime News: एकाच वर्गात शिकणाऱ्या मुला-मुलीचे अपहरण

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून एकाच वर्गात शिकणारे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि मुलगी गुरुवारी (ता. २८) सकाळपासून बेपत्ता झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून एकाच वर्गात शिकणारे १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि मुलगी गुरुवारी (ता. २८) सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. (Kidnapping of boy and girl studying in same class Jalgaon Crime News)

याप्रकरणी फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गरिमा राजेंद्र तुलसी (वय १५) आणि रोनक दीपकसिंग (वय १५) असे बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुला-मुलीचे नाव आहे.

गरिमा आणि रोनक हे दोन्ही विद्यार्थी सिंधी कॉलनीतील एका शाळेत व एकाच वर्गात शिकतात. गुरुवारी सकाळी अकराला शाळेत आले.

मात्र, नंतर ते तेथूनच गायब झाले आहेत. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; परंतु दोघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

अखेर रात्री अकराला विद्यार्थ्यांच्या पालकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT