Kirankumar Bakale  esakal
जळगाव

Kirankumar Bakale Controversy Case : बकालेंना मदत करणारे दोघे नियंत्रण कक्षात

किरणकुमार बकाले यांना अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना मदत करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून नियंत्रण कक्षात जमा करण्याचे आदेश पारित केले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Kiran Kumar Bakale Case : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात दाखल गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना मदत करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून नियंत्रण कक्षात जमा करण्याचे आदेश पारित केले आहेत.

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी तत्कालीन गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात दीड वर्ष ते फरार होते. १५ जानेवारी रोजी अटकेनंतर न्यायालयात हजर केल्यावर त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस कोठडी संपल्यावर न्यायालयीन कोठडीत बुधवारी (ता.१७) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमक्ष हजर केले. जामीन अर्जावर कामकाजाप्रसंगी त्यांना कारागृहात पाठवण्याचे आदेशित केले.

मात्र धुळे कारागृहात रवाना करण्यापूर्वी बकाले यांना मोबाईल, इअर बर्ड देऊन बोलण्याची सोय जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात पोलिसांनी केली होती.

या प्रकरणी मराठा समाजाने आक्षेप घेत चौकशी व संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता.१९) जिल्हापेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी ईश्वर खवले आणि चंद्रकांत पाटील अशा दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना नियंत्रण कक्षात जमा केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT