Crime
Crimesakal

Thane Crime: डॉक्टरच्या हत्येची सुपारी देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

Crime : आर्थिक देवाण-घेवाणीच्या व्यवहारात वाद झाल्याने नाशिक येथील डॉक्टरला ठार मारण्यासाठी सुपारी देणाऱ्या महिलेवर कापूरबावडी पोलिसांना शनिवारी गुन्हा दाखल केला. ठाणे गुन्हे शाखा खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिला नाशिकमधील एका डॉक्टरची हत्येची सुपारी देण्यासाठी किलरच्या शोधात असल्याची माहिती मिळाली.

या वेळी बनावट सुपारी किलर बनवून पोलिसांच्या मदतीसाठी फिर्यादी फिरोज अलाउद्दीन खान (वय ५८) यांना पाठविले. फिर्यादीने आरोपी नेहा जाधव हिला संपर्क केला असता तो तिला ओळखत होता.

Crime
Pune Crime : प्रेमसंबंधास विरोध केल्याने मैत्रिणीच्या आईचा गळा आवळून खून

त्याने तिला चिंतेत असल्याबाबत विचारणा केल्यानंतर नेहा हिने सुपारी किलरचा शोध घेत असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादीने काम करण्यास होकार दिला. या कामाचे नेहाने फिर्यादीला ३ लाख रुपये देण्याचे कबूल केले.

तसेच हत्येसाठी एक इंजेक्शन आणि इंजेक्शन सिरिंज विकत घेऊन दिली. दरम्यान फिर्यादीने पोलिसांच्या रेकॉर्ड व्हाईसवर सर्व संभाषण रेकॉर्ड करून हत्येचा कट उधळला. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी नेहाविरोधात गुन्हा दाखल केला असून खंडणीविरोधी पथक आणि कापूरबावडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Crime
Jalgaon Crime News : 9 लाखांची सोन्याची लगड घेउन बंगाली कारागीर पसार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com