balloon seller
balloon seller 
जळगाव

प्रकाशातही जगण्याचा अंधार..संध्याकाळी दोन घास मिळतील याची शाश्‍वती नाही; नुसतेच गावोगावी फिरणे

दीपक कच्छवा

मेहुणबारे (जळगाव) : कोरोनामुळे गावोगावी असलेल्या यात्रा बंद असल्याने राजस्थानी फुगे, बाहुल्या विक्रेत्यांना आजही जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या विक्रेत्यांवर कोरानामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मिळेल तिथे फुगे विकून कुठेतरी रस्त्याच्या कडेला थांबून मिळेल ते खाऊन दिवस काढत आहेत.

राजस्थानमधील जयपूर काचीकुडा भागातील फुगे विक्रेते गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात फुगे विक्रीसाठी आले आहेत. मात्र कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे गावागावाच्या जत्रा, यात्रा बंद असल्याने फुगे विक्री करतांना त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जत्रा बंद असल्याने गावोगावी जावून फुगे विकून कशीतरी गुजरान विक्रेत करीत आहेत. दिवसभरात अपेक्षेप्रमाणे फुगे विक्री होतील आणि पोटात संध्याकाळी दोन घास खायला मिळतील याची कुठलीही शास्वती त्यांना नाही.

आमच्या नशिबी मात्र अंधार 
पाठीवर बिऱ्हाड घेऊन मजल दरमजल करीत फुगे विक्रेते कुटुंबे या गावातून त्या गावात जावून फुगे विक्री करतात. फुगे विकून गावातील चिमुकल्याना आनंद देणाऱ्या या फुगे विक्रेत्यांच्या नशिबी मात्र अंधार आहे. लॉकडाऊनमुळे फुगेविक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याने या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

नशिबाचा फेरा काही चुकत नाही
पती, पत्नीसोबत लहान मुले असे कुटुंब व सोबत साहित्य घेवुन दुचाकीची छोटी गाडी तयार करुन या गाडीवरच संसाराचा गाडा घेऊन गावोगावी फिरतात. त्यांच्या या लहान चिमुकल्यांसह भर उन्हात रस्‍त्‍याच्या कडेला एका ठिकाणी थांबून विक्री करतात; अशी स्थिती त्यांची आहे. बऱ्याच वेळा फुगे विकून पैसे मिळत नसल्याने तसेच उपाशीपोटी झोपण्याची वेळ येते. कुणीतरी एखादा दयाळू भेटतो मात्र नशिबाचा हा फेरा काही चुकत नाही.

मेहुणबारे भागात दाखल 
मेहूणबारे परीसरात राजस्थान जयपुर भागातील चार कुटुंबे मेहूणबारे परिसरात फुगे विक्रीच्या निमीत्ताने मजल दरमजल करीत भटकंती करीत आहेत. या उपासमारीमुळे त्यांच्या कुटुंबांची ससेहोलपेट होत आहे. कोरोनाने त्यांचा रोजगार हिरावून नेला आहे.जगण्यासाठी चाललेली धडपड जीवनमरणाच्या लढाईत जीव कासवीस करणारी आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT