corona shutdown
corona shutdown 
जळगाव

Breaking जळगाव जिल्‍हाही होतोय लॉक; शाळा, महाविद्यालयासोबत बरेच काही बंद

देवीदास वाणी

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्‍याने जळगाव जिल्ह्यातही खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्‍ह्‍यातील रूग्‍ण संख्या वाढत असल्‍याने संचारबंदी लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. पहिल्‍या टप्प्यात आता रात्री दहापासून संचारबंदी लागू करण्यात येत असून शाळा, महाविद्यालयांसोबत आणखी काही बंद करण्याचा निर्णय जिल्‍हाधिकारी यांनी घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात लॉकडाउनचे संकेत देण्यात आले आहेत. परंतु, नागरीकांकडून अजून देखील काळजी घेण्यात येत नसल्‍याने परिणामी जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महत्‍त्‍वाचा निर्णय घेतला आहे. जिल्‍हाधिकारी यांनी आज यासंदर्भात आज बैठक घेवून निर्णय ६ मार्चपर्यंत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी, कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. 

शाळांसोबत हेही असणार बंद
जिल्‍ह्‍यातील सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी क्‍लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच सिनेमा गृहे, व्यायाम शाळा, सार्वजनिक कार्यक्रम आणि आठवडे बाजार देखील बंद करण्यात आले आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली असून धार्मिक स्थळे मात्र केवळ पूजेसाठी खुली राहणार आहेत. 

रात्रीची संचारबंदी
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्‍ह्‍यात संचारबंदीचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ही संचारबंदी संपूर्ण जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत घोषित करण्यात आली आहे.
 

शाळांबाबत निर्णय असा… 
सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. या कालावधीत जर परिक्षा असतील तर त्या घेता येणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहता येईल. अभ्यासिका (लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT