covid hospital
covid hospital covid hospital
जळगाव

अजब..मान्यता नसताना कोविड रुग्णांवर उपचार; त्‍यात रेमडेसिव्हिरचा अनावश्‍यक वापर

सचिन जोशी

जळगाव : क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण, कोविड नियमांचे उल्लंघन आणि रुग्णांच्या जिवावर बेतेल, असा रेमडेसिव्हिरचा वापर व ऑक्सिजनचा अनावश्‍यक वापर अशा वेगवेगळ्या व गंभीर कारणांसाठी शहरातील चार खासगी हॉस्पिटलांना प्रशासनाने नोटीस बजावली आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक खासगी हॉस्पिटलला कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपासून यातील काही हॉस्पिटल मनमानी पद्धतीने कारभार करत असून, रुग्णांची लूट व त्यांच्या जिवाशी खेळ होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परवानगी नसताना कोविड रुग्णांवर उपचार सुरू असून, काही ठिकाणी रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनचा अनावश्‍यक वापर सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून तपासणी

हे प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या पथकाने शहरातील खासगी हॉस्पिटलची अचानक तपासणी केली. त्यात काही ठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन, रुग्णांच्या जिवाशी खेळ यासह काही अनियमितता आढळून आल्या.

चार हॉस्पिटलांना नोटिसा

नियमबाह्य कामे, चुकीचे उपचार यांसह अन्य विविध कारणांसाठी शल्यचिकित्सकांनी चार हॉस्पिटलांना नोटिसा बजावल्या आहेत. यात टायटन हॉस्पिटल, दत्त हॉस्पिटल (डॉ. उमेश साळुंखे), संवेदना हॉस्पिटल (डॉ. सुदर्शन पाटील) व वेदांत हॉस्पिटल (डॉ. प्रदीप कुकरेजा) यांना नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसांत खुलासा सादर करावे, असे म्हटले आहे.

टायटन हॉस्पिटलमध्ये या गंभीर त्रुटी आढळल्या

- मान्यता नसताना कोविडचे रुग्ण दाखल

- तज्ज्ञ डॉक्टर नसताना आयसीयूत रुग्ण दाखल

- दीड महिन्यापासून रेमडेसिव्हिरचा सर्रास वापर

- ऑक्सिजनचा अनावश्‍यक वापर

- आयसीयूत युनानी डॉक्टरद्वारे उपचार

दत्त हॉस्पिटलमधील त्रुटी

- ३५ बेडची परवानगी असताना जास्त रुग्ण

- ज्यांच्या नावे नोंदणी आहे त्या डॉक्टरऐवजी युनानी डॉक्टर हजर

- रेमडेसिव्हिरची गरज नसताना रुग्णांना दिले

- ऑक्सिजनचा गरजेपेक्षा जास्त वापर

- दरपत्रक दर्शनी भागात नाही

- सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही

संवेदना हॉस्पिटलमधील त्रुटी

- ६० बेडची परवानगी असताना ७० रुग्ण

- दरपत्रक दर्शनी भागात नाही

- रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनचा अनावश्‍यक वापर

- ऑक्सिजनची गरज नसलेले रुग्णही दाखल

- सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही, पीपीई किटचा वापर नाही

मान्यता निलंबित, तरीही ‘वेदांत’ सुरू

९ मार्चला डॉ. प्रदीप कुकरेजा यांच्या वेदांत हॉस्पिटलची मान्यता निलंबित करण्यात आली आहे. तरीही याठिकाणी कोविडचे पाच रुग्ण दाखल आहेत. दरपत्रक दर्शनी भागात नाही, डोनिंग व डोफिंगची व्यवस्था नाही, युनानी डॉक्टरवर काम सुरू, डॉक्टर हजर नसल्याने कोविडमुळे मृत्यू झाल्यामुळे आपण जबाबदार आहात, रेमडेसिव्हिर व ऑक्सिजनचा अनावश्‍यक वापर केल्याने तुटवडा अशा कारणांखाली या हॉस्पिटलला कठोर शब्दांत नोटीस बजावण्यात आली आहे.

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT