Crime
Crime 
जळगाव

पुन्‍हा उफाळला निवडणुकीचा वाद; पराभूत उमेदवाराकडून थेट तलवार हल्‍ला

राजेश सोनवणे

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गावांमध्ये वाद उफाळत आहेत. यात उमाळा (ता. जळगाव) येथे दोन गट एकमेकांसमोर आले. यातून तलवार हल्ला झाला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहिर झाला. यात कोणाचा विजय तर कोणाचा पराभव झाला. परंतु, पराभव झाल्‍याचे जिव्हारी लागत असल्‍याने निवडणुकीत पडलेल्‍या उमेदवाराकडून विजयी उमेदवारावर हल्‍ला चढविला जात आहे. जिल्‍ह्‍यातील आज घडलेली तिसरी घडना असून, यात दोन जण जखमी झाले आहेत.

हातात तलवार घेवून आले अन्‌
जळगाव तालुक्यातील उमाळा येथे वार्ड क्रमांक दोनमधील विजयी महिला उमेदवाराचे नातेवाईक प्रकाश साहेबराव चव्हाण (वय ४५) यांना त्यांचे प्रतिस्पर्धी पाटील गटातील आठ ते ९ जणांनी बेदम मारहाण केली. यात संशयित आरोपी राजू बाबुराव पाटील याने तलवार घेवून प्रकाश चव्हाण यांच्या हातावर तलवारने वार करून जखमी केले. तर चव्हाण गटातील तीन ते चार जणांनी देखील पाटील गटावर हल्ला करून किरण भिमराव पाटील यांच्यावर लोखंडी हत्याराने वार केले. या हाणामारीत किरण पाटील आणि प्रकाश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहे. 

राजकिय वाद उफाळताय
ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमुख पक्षांचा विषय नसला; तरी पॅनलला सपोर्ट असतो. अथार्त विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्‍यानंतर देखील वाद निर्माण होत नाही. ते वाद ग्रामपंचायत स्‍तरावरील निवडणुकीत होत आहेत. जळगाव जिल्‍ह्‍यात तिन ग्रामपंचायतींमध्ये पराभूत झालेल्‍या उमेदवाराकडून विजयी उमेदवारावर हल्‍ला चढविल्‍याची घटना झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT