farmer death
farmer death 
जळगाव

गुरे चारताना पाय घसरला; शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : तापी नदीच्या काठी गुरे चारतांना पाय घसरून पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भादली शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-news-tapi-river-farmer-death-legs slipped)

जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथील शेतकरी सुधाकर बाबुलाल सोनवणे (वय ३८) हे भादली शिवारातील शेतात गेले होते. सोनवणे हे तापी नदीच्‍या काठालगत असलेल्‍या स्वत:च्या शेतात गुरे चारत होते. या दरम्‍यान तापी नदीत त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. खोल पाण्यात पडल्‍याने त्‍यांना बाहेर येता आले नाही. यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला.

नागरीकांची आरडाओरड

सुधाकर सोनवणे हे बुडत असल्‍याचे पाहून आजूबाजूच्या नागरीकांनी आरडाओरड केली. परंतु. त्‍याचा उपयोग झाला नाही. यानंतर लागलीच शोधाशोध सुरू केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. साधारण एक किलोमीटर अंतरावर भोकर शिवारात तापी नदीच्‍या काठालगत त्यांचा मृतदेह आढळून आला. सुधाकर सोनवणे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, भाऊ, दोन बहिणी, आई असा परिवार आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रात्री त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT