market Start buying cotton
market Start buying cotton 
जळगाव

कापूस खरेदी; ४ हजार ३११ रूपये भाव 

सकाळ वृत्तसेवा

कजगाव (ता. भडगाव) : येथील खासगी व्यापाऱ्याने गणेश चतुर्थी उत्सवाच्या मुहूर्तावर कापूस खरेदी प्रारंभ केला असून मुहूर्त खरेदीच्या दिवशी ४ हजार ३११ रूपयेचा भाव जाहीर करून खरेदीला सुरूवात केली. पहिल्याच दिवशी दीडशे क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. 
कापसाचे व्यापारी दिलीप जैन यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. यावर्षी पावसाने सुरूवात चांगली केली आहे. कापूस पिकाची अवस्धा जोमदार आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था व थोडे पाण्याची उपलब्धता होती; अशांनी बागायती कापसाची लागवड केली होती. त्यांची वेचणी सुरू झाली आहे. तर कोरडवाहू लागवड देखील दहा पंधरा दिवसात वेचणी सुरू होण्याची शक्‍यता आहे. संपूर्ण पावसाळ्यात दमदार पाऊस पडला असल्याने नदी- नाले, के टी वेअर बंधाऱ्यात मुबलक पाणी साठा आहे. रब्बी हंगाम देखील यावर्षी पाऊस चांगला येईल अशी आशा असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

मक्‍यालाही अकराशे रूपये भाव
पितृपक्ष संपल्‍यानंतर कापूस खरेदीच्या मुहूर्तावर सुमारे दीडशे क्विंटल कापसाची खरेदी झाली. तसेच मका खरेदीचा देखील मुर्हर्त आज झाला असून पहिल्या दिवशी अकराशे रूपयांचा भाव मिळाला. यावेळी तीन चार ट्रक्टर मका खरेदी झाला. कापूस, मका खरेदी शुभारंभप्रसंगी व्यापारी दिलीप जैन, मनोज धाडीवाल, नितीन वाणी, चिंतामण पाटील, बापू पाटील, रमेश सोनार, नितीन सोनार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. दरम्यान विविध कोरोना संकटामुळे मागील वर्षाचा कापूस खरेदी झाला नाही. यामुळे यावर्षी भाव कमी मिळणार तर नाही ना? असा प्रश्न शेतकरी समोर आहे शासनाने लवकर दराने हमी भावात कापूस खरेदीची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT