pm fasal pik policy
pm fasal pik policy 
जळगाव

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत जिह्यात फळपिकांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्चित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२०-२१, २१-२२, २२-२३ या तीन वर्षांकरीता मृग बहार व आंबिया बहाराकरीता लागु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये जळगाव जिल्हयासाठी मृग बहारा करीता मोसंबी, चिकू, पेरु, डाळोंब व लिंबू या फळपिकांसाठी तर आंबिया बहारासाठी मोसंबी, डाळींब, आंबा व केळी या फळपिकांचा समावेश आहे. 

जळगाव जिल्हयामध्ये महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरून ही योजना फळपिकासाठी अधिसुचित मंडळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेव्दारे मृग बहार फळपिक निहाय कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त पाऊस, आर्द्रता, जादा आर्द्रता, व गारपीट या हवामान घटकाच्या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे. ही योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसुचित क्षेत्रांतील अधिसुचित फळपिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसुचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणा पत्र देणर नाहीत. त्या सर्व शेतक-यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी दिली.

मृग बहार २०२०-२१ करीता हवामान आधारीत फळपिक विमा योजनेमध्ये सहभागाचे वेळापत्रक व विमा संरक्षित रक्‍कम, विमा हप्ता दर आदी तपशिल खालील प्रमाणे आहे.
पेरू - विमा संरक्षित रक्‍कम ६०,०००, विमा हप्ता- ३०००, अंतिम मुदत २० जून २०२०. 
लिंबू- विमा संरक्षित रक्‍कम ७०, ०००, विमा हप्ता ३५००, अंतिम मुदत 20 जून 2020 जून 2020
मोसंबी - विमा संरक्षित रक्‍कम ८०,०००( गारपीट २६६६७), विमा हप्ता- ४००० (गारपीट १३३३ ), अंतिम मुदत ३० जून २०२०. 
चिकू - विमा संरक्षित रक्‍कम ६०,०००, विमा हप्ता- ३०००, अंतिम मुदत ३० जून २०२०. 
डाळिंब - विमा संरक्षित रक्‍कम १, ३०,००० (गारपीट ४३३३३), विमा हप्ता- ६५०० (गारपीट २१६७), अंतिम मुदत १४ जुलै २०२०. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT