Thief 
जळगाव

जळगावःअस्थी विसर्जनासाठी गेलेल्या कुंटूबाच्या बंद घरात चोरी

पत्नी कविता व मुले अयोध्यानगरात घरी आले, त्यांना घराचे कुलूप तुटलेले, तर सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला.

सकाळ वृत्तसेवा

जळगावः औद्योगीक वसाहत परिसरातील अयोध्यानगर येथे नरेंद्र ओमप्रकाश दुबे (वय-४७) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ७५ हजारांची (Thieves) रोकड, दागिण्यांसह १ लाख ७० हजारांचा ऐवज चोरुन (Theft) नेला. दुबे कुटूंबीय अस्थीविसर्जनासाठी गेले असतांना चोरट्यांनी त्यांचे बंद घर फाडून चोरी केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) गुन्हा दाखल झाला आहे.


जळगाव शहरातील अंजीठा चौफूली जवळील अयोध्यानगरात नरेंद्र दुबे हे पत्नी व मुलांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे ट्रान्सपोर्ट नगरात ओम रोडलाईन्स नावाने ट्रान्सपोर्ट आहे. रविवार (ता.१० ऑक्टोंबर) रोजी नरेंद्र दुबे यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याने त्यांच्या अस्थी विसर्जन कार्यक्रमासाठी नाशिक येथे गेले होते. तर, दुबे यांची पत्नी कविता व मुलांसह वाघनगरात माहेरी गेल्याने अयोध्यनगरातील घर बंद होते. सोमवारी सकाळी नवरात्र निमित्ताने ज्योत पेटविण्यासाठी दुबे यांची पत्नी कविता व मुले अयोध्यानगरात घरी आले, त्यांना घराचे कुलूप तुटलेले, तर सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. मुलांनी ही बाब नाशिक गेलेल्या वडीलांना (नरेंद्र दुबे) कळविली.

त्यांनी लगेच एमआयडीसी पोलिस ठाण्यात कळवली. घटनेची माहिती मिळाल्यावर दुबे हे रेल्वेने दुपारी १ वाजता जळगावात पोहचले. घरातील वस्तूंची खात्री केली असता, चोरट्यांनी घरातून कपाटातील ७५ हजार रुपये रोख, २५ हजारांचे १२० चांदीचे शिक्के व ४५ हजारांचे सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण १ लाख ७० हजारांचा ऐवज लांबविल्याचे समोर आले. माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. याप्रकरणी सोमवारी रात्री नरेंद्र दुबे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT