esakal | बीएचआर घोटाळा: आरोपी ठरू नये म्हणून ‘साक्षीदारां’साठी रांग..
sakal

बोलून बातमी शोधा

Police

बीएचआर घोटाळा: आरोपी ठरू नये म्हणून ‘साक्षीदारां’साठी रांग..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव: बीएचआर घोटाळ्यात (BHR Scam) पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाने (Pune Economic Crime Branch) गेल्या सहा महिन्यात भल्या-भल्यांना अस्मान दाखवले. आमदारापासून ते थेट लिकर किंगही यातून स्वतःला वाचवू शकले नाही. तपासाचा रोख आणि आपदा ओढवून घेण्यापेक्षा गुन्हे कबूल करून पैसा भरणेच सर्वांनी पसंत केले. तर, दाखल गुन्ह्यात आरोपी ठरण्यापेक्षा आताच साक्षीदार झालेले बरे म्हणून साक्षीदारांच्या (Witness) रांगाच लागल्या आहेत. गुन्हेगार (Criminals) तेथीलच साक्षीदारही असून पुणे आर्थिक गुन्हेशाखेने जळगावात २३ महत्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी १२७ अर्जांची विक्री


बीएचआर अवसायक कार्यकाळात घडवून आणलेल्या घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हेशाखेने तपासाची यशस्वी धुरा सांभाळत मुख्य संशयित सुनील झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह इतरांना अटक केली. पहिल्या अटक सत्राचा जोर कमी होत नाही तोवर, जळगावातील बड्या हस्तीवर थेट हात घातल्याने एकच खळबळ माजली. कोट्यवधींचे कर्ज घेऊन ते नियमाने फेडण्याऐवजी पावत्या मॅचिंगचा गुन्हेगारी फंडा अवलंबून अनेकांनी कोट्यवधींचा लाभ पदरात पाडून घेतला. न्यायालयात पैसा भरण्याच्या हमीवर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. तर प्रमुख संशयित अद्यापही कारागृहातच आहेत. परिणामी पावत्या मॅचिंग फंड्यात आरोपी ठरण्याऐवजी साक्षीदार होणे काय वाईट म्हणून स्वतःहून साक्षीदार होण्याचीही अनेकांनी तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र बंद : जळगावात मविआ-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा


जिथले संशयित तिथेच साक्षीदार
बीएचआर घोटाळ्याचे कटकारस्थान रचणारे प्रमुख संशयितांचा रहिवास असलेल्या ठिकाणीच महत्त्वाचे साक्षीदार नोंदवले जाणार आहेत. त्यात सोयगाव (ता.औरंगाबाद), जामनेर, जळगाव, पाळधी- धरणगाव, अमळनेर आणि नंतर धुळे अशा तीन जिल्ह्यात पुढील काही दिवस जवळपास शंभरच्यावर साक्षीदारांच्या महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविल्या जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

loading image
go to top