esakal | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी १२७ अर्जांची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

JDCC Bank

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी १२७ अर्जांची विक्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती (जेडीसीसी) बँकेच्या (Jalgaon District Co-operative Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीची (Election) सोमवारपासून रणधुमाळी सुरू झाली आहे. २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज विक्री व स्वीकृती सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी १२७ उमेदवारी अर्जाची (Candidature application) विक्री झाली. तर बँकेचे संचालक, आमदार चिमणराव पाटील यांनी दोन अर्ज आज भरले आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्र बंद : जळगावात मविआ-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा


उमेदवारीसाठी केवळ ४ दिवस

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यात १५ ऑक्टोबर (विजया दशमी), १६ ऑक्टोबर (शनिवार), १७ ऑक्टोबर (रविवार) असे तीन दिवस सुटी असणार आहे. यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार दिवसांचा कालावधी आहे. सर्वच राजकीय पक्षांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी असणार आहे. सोमवारी (ता.१८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. यामुळे या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी होणार आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या निवडणूका जाहीर


आमदार भोळे विरोधात महाजन
‘जेडीसीसी’ जागरूक जनमंचतर्फे आज ६ उमेदवारी अर्ज विकत घेतले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ उमेदवार आम्ही देऊ असे जनमंचचे प्रवक्ते ईश्‍वर मोरे यांनी सांगितले. या निवडणुकीत बँकेचे संचालक, आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.आज त्यांचाही अर्ज आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top